Narendra Modi Stadium Latest NewsFOLLOW
Narendra modi stadium, Latest Marathi News
गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात.