शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
4
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
5
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
6
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
7
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
8
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
9
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
10
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
11
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
12
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
13
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
14
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
15
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
17
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
18
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
19
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
20
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 13:33 IST

Pakistan Alcohol Export : कर्जात बुडालेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा मद्य निर्यातीला सुरुवात केली आहे. मरी ब्रूअरीकडून ब्रिटन, जपानला पुरवठा.

प्रचंड परकीय कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानने आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी ५० वर्षांनंतर पुन्हा एकदा मद्य निर्यातीचा मार्ग स्वीकारला आहे. पाकिस्तानमधील एकमेव स्थानिक कंपनी 'मरी ब्रूअरी' ने एप्रिल २०२६ मध्ये ब्रिटन, जपान, पोर्तुगाल आणि थायलंड यांसारख्या देशांना बीयर आणि इतर मद्य उत्पादने पाठवण्यास सुरुवात केली आहे.

एप्रिल १९७७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी इस्लामिक नियमांचा हवाला देत पाकिस्तानात मद्यविक्री आणि निर्यातीवर बंदी घातली होती. त्यानंतर लष्करी शासक झिया उल हक यांनी हे कायदे अधिक कडक केले. मात्र, २०२५ मध्ये पाकिस्तान सरकारने आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या बंदीत सवलत दिली. आता ओआयसी या इस्लामिक देशांच्या संघटनेचा भाग नसलेल्या देशांना ही उत्पादने विकली जात आहेत.

अर्थव्यवस्थेची बिकट स्थितीपाकिस्तानवर सध्या १३८ अब्ज डॉलरचे प्रचंड परकीय कर्ज आहे. वित्त वर्ष २०२६ मध्ये पाकिस्तानचे एकूण उत्पन्न ४० अब्ज डॉलर असताना खर्च ५८ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील ३० अब्ज डॉलर (सुमारे ७५% उत्पन्न) केवळ कर्जाचे व्याज फेडण्यात खर्च होत आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान आता मद्य निर्यातीकडे उत्पन्नाचे एक साधन म्हणून पाहत आहे.

मरी ब्रूअरीची मोठी झेपगेल्या अनेक वर्षांपासून केवळ 'नॉन-अल्कोहोलिक' पेये विकणाऱ्या मरी ब्रूअरीने आता जागतिक बाजारपेठेत आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. १९७७ पूर्वी ही कंपनी भारत, अफगाणिस्तान आणि अमेरिकेला मद्य निर्यात करत असे. आता पुन्हा एकदा युरोप आणि आशियाई देशांमध्ये आपले नेटवर्क विस्तारण्याची योजना कंपनीचे सीईओ इस्फानयार भंडारा यांनी आखली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan Resumes Alcohol Exports After 50-Year Ban Amid Economic Crisis

Web Summary : Facing a massive debt crisis, Pakistan restarts alcohol exports after a 50-year ban. Muree Brewery, the sole local producer, began exporting to countries like Britain and Japan in April 2026, aiming to bolster the struggling economy through international sales.
टॅग्स :Pakistanपाकिस्तान