शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

Video: पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा धुमाकूळ; रस्त्यांवर नद्या वाहू लागल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 17:27 IST

पुढील २४ तासांत जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होणार, हवामान विभागाचा अंदाज

पुणे : पुण्यात दुपारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विजांचा कडकडाटसह पाऊसपुणेकरांना झोडपून काढत आहे. रस्त्यांवरून अक्षरश नद्या वाहू लागल्या आहेत. सर्व भागात वाहतूककोंडी झाल्याचे चित्र आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून पुणेकरांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. पुढील २४ तासांत जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीहोण्याबाबतचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे, 

पुण्यात गेल्या दोन तीन दिवसांच्या पावसाने धरणे पूर्ण भरली आहेत. धरणातून विसर्गही सुरु करण्यात आला आहे. पुणे शहर, उपनगर आणि ग्रामीण भागामध्ये सध्या पासून पडत आहे. सकाळपासून अंधारून आल्याने सूर्यनारायणाचे दर्शनही पुणेकरांना झाले नाही. जोरदार पावसामुळे शहरातील विविध सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. शिवाजीनगर, एरंडवणा, सिंहगड रस्ता, बाणेर-बालेवाडी, सातारा रस्ता, कात्रज, लष्कर परिसर, हडपसर, कात्रज, लोहगाव विमाननगर अशा सर्वच परिसरांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. 

मॉन्सून परत जातोय की परत आलाय !

पुण्यामध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये मॉन्सूनचा पाऊस सरासरीहून अधिक पडला आहे. परतीच्या प्रवासाला निघालेल्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे पुणेकर सोशल मीडियावर मॉन्सून परत जातोय की, परत आलाय? यावर विनोद करत आहेत. मॉन्सून आल्यावर ज्या प्रकारचे वातावरण तयार होते, अगदी तशीच स्थिती सध्या निर्माण झाली आहे.

पुणे जिल्ह्यात आज ‘रेड अलर्ट !’

मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी बुधवारी (दि.२५) जोरदार ते अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसेच नगर आणि नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. पुण्यात २५ नंतर दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसenvironmentपर्यावरणNatureनिसर्गPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाriverनदीDamधरण