शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मौजेसाठी स्पोर्ट्स बाईक चोरणाऱ्या तीन तरुणांस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 21:47 IST

चाेरटे महागड्या स्पाेर्ट्स बाईक चाेरत असल्याने सिंहगड राेडवरील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण हाेते.

पुणे : सिंहगड रस्ता परिसरासह पुणे शहरात दुचाकी चोरांनी धुमाकूळ घातला होता. महागड्या किंमतीच्या स्पोर्ट्स बाईक चोरी करणाऱ्या तीन तरुणांना सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेऊन दहा स्पोर्ट्स बाईक हस्तगत केल्या आहेत. शुभम राजेंद्र राठोड (वय २१, रा सिद्धिविनायक सोसायटी, फ्लॅट नं ११, जांभुळवाडी, आंबेगाव पुणे) आकाश कैलास देवकाते  (वय २४, रा सदर) व आकाश उर्फ अंश दत्तमिलन घिरटकर (वय २०, रा ऍक्टिव्ह फाउंडेशन बिल्डिंग, जांभुळवाडी, आंबेगाव, पुणे) अशी तीन चोरट्यांची नावे आहेत.

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, गेल्या काही दिवसांपासून सिंहगड रस्त्यावरील विविध भागातून वाहनचोरीच्या  घटना वारंवार घडत असल्याने 'वाहनचोरांनी दिले पोलिसांनाच आव्हान' या मथळ्याखाली दैनिक लोकमत मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी दखल घेऊन सिंहगड रस्ता पोलिसांना तातडीने वाहनचोरांना शोधण्याच्या सूचना दिल्या होत्या.गेल्या काही दिवसांपासून सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरांनी धुमाकूळ घातला होता. दहा दिवसांत सहा दुचाकी चोरटयांनी गायब केल्या असल्याने एकप्रकारे वाहनचोरांनी पोलिसांनाच 'चॅलेंज' दिले होते. दररोज अथवा एकदिवसाआड वाहनचोरी होत असल्याने नागरिकांसह पोलिसही हतबल झाले होते. काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळूनही पोलिसांना चोर मिळत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये 'वाहनचोरी' चर्चेचा विषय होता. याबाबत सिंहगड रस्ता तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी दिवसरात्र चोरट्यांना शोधण्याचा चंगच बांधला होता. पोलीस कर्मचारी श्रीकांत दगडे व पुरुषोत्तम गुन्ला यांना मिळालेल्या माहितीवरून तसेच सीसीटीव्हीच्या आधारे तीनही चोरटयांना सिंहगड रस्ता पोलिसांनी जेरबंद केले. सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त पी. डी . राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चेतन थोरबोले, उपनिरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस कर्मचारीदत्ता सोनवणे, दयानंद तेलंगेपाटील, सचिन माळवे , रफिक नदाफ, योगेश झेंडे, हरीश गायकवाड, बालाजी जाधव, किशोर शिंदे, अविनाश कोंडे, यशवंत ओंबासे, मोहन भरुक , वामन जाधव, राजेंद्र सुर्वे, राहुल शेडगे यांच्या पथकाने केली.    

तीन मिनिटात स्पोर्ट्स बाईकची चोरी; उच्चशिक्षित चोरटेस्पोर्ट्स बाईकची चोरी करण्याच्या आधी हे चोरटे परिसराची रेकी करीत असता. त्यानंतर बाईकवर पाळत ठेवून संधी साधून तोंडाला रुमाल बांधून फक्त तीन मिनिटाच्या आत दुचाकीचे हॅण्डल लॉक तोडून गाडी सुरु करून घेऊन जात होते. बऱ्याच ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची अशाच प्रकारची दृश्ये पोलिसांनी आढळली होती. शुभम राठोड हा दुचाकी चोरायचा व आकाश देवकाते व अंश घिरटकर त्याला मदत करीत असत.घिरटकर ह्याचे 'सीए' करीत असून बाकी दोनही चोरटे शिक्षण करीत आहेत. त्यांनी चोरलेल्या दहा दुचाकीपैकी तीन दुचाकी परभणी येथे विकल्या होत्या. तर बाकी दुचाकी पुण्यातच मिळून आल्या आहेत. हस्तगत केलेल्या दहा दुचाकीपैकी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ५, भारती विद्यापीठ पोलीस ठाणेच्या हद्दीतून २ तर वारजे, हिंजवडी, लष्कर या पोलीस ठाणे हद्दीतून प्रत्येकी एक दुचाकी अशा एकूण ८ लाख ४० हजार रुपये किमतीच्या स्पोर्ट्स बाईक हस्तगत केल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेtheftचोरीPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलर