कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान आज अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. दक्षिण दिनाजपूर, मुर्शिदाबाद आणि सिलीगुडीमध्ये राजकीय पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव वाढला आहे. असे असूनही, सकाळी ११ वाजेपर्यंत बंगालमध्ये ४१.११% तर दुपारी १ वाजेपर्यंत ६२.१८ टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे.
कुमारगंजमध्ये भाजप उमेदवारावर हल्लादक्षिण दिनाजपूरमधील कुमारगंज विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार शुभेंदू सरकार यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. एका बूथवर 'बूथ जॅमिंग' होत असल्याची माहिती मिळाल्यावर सरकार तिथे पोहोचले असता, त्यांना बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. पोलिसांनी मूकदर्शक बनून हा प्रकार पाहिल्याचा गंभीर आरोप शुभेंदू सरकार यांनी केला आहे.
हुमायून कबीर यांच्या गाडीवर दगडफेकमुर्शिदाबादमध्ये हिंसाचाराचे तांडव सुरूच असून रेजीनगर येथील AJUP उमेदवार हुमायून कबीर यांच्या ताफ्यावर जमावाने हल्ला केला. आंदोलकांनी त्यांच्या कारला घेरून लाठ्या-काठ्यांनी आणि विटांनी हल्ला केला, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिलीगुडीत भाजप-TMC आमनेसामनेसिलीगुडीतील जगदीश चंद्र विद्यापीठ येथील मतदान केंद्राबाहेर भाजप आणि TMC कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी भाजप उमेदवार शंकर घोष घटनास्थळी उपस्थित होते. वाद वाढत गेल्याने दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की सुरू झाली, मात्र केंद्रीय सुरक्षा दलाच्या (CAPF) जवानांनी तात्काळ हस्तक्षेप करत जमावाला पांगवले आणि मोठी दुर्घटना टळली.
Web Summary : West Bengal's first phase voting saw violence in several areas. BJP candidate Shubhendu Sarkar was allegedly attacked. Clashes erupted in Murshidabad and Siliguri. Despite this, Bengal recorded 41.11% voter turnout till 11 AM.
Web Summary : पश्चिम बंगाल के पहले चरण के मतदान में कई क्षेत्रों में हिंसा हुई। भाजपा उम्मीदवार शुभेंदु सरकार पर कथित हमला। मुर्शिदाबाद और सिलीगुड़ी में झड़पें हुईं। इसके बावजूद, बंगाल में सुबह 11 बजे तक 41.11% मतदान हुआ।