Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!

Mukesh Choudhary Mother Passes Away, IPL 2026: यंदाचा हंगाम सुरू झाल्यापासून चेन्नईचे खेळाडू सतत दुखापतीमुळे बाहेर होत आहेत. त्यात आता चेन्नईची चिंता अधिकच वाढली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 13:30 IST

Open in App

Mukesh Choudhary Mother Passes Away: IPL 2026 चा ३३वा सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळला जाणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या MI vs CSK सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सला एक मोठा भावनिक धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीच्या आईचे निधन झाले आहे. या कठीण प्रसंगी मुकेश कुमार घरी गेला आहे. त्यामुळे तो आगामी सामन्याला मुकणार आहे. यंदाचा हंगाम सुरू झाल्यापासून चेन्नईचे खेळाडू सतत दुखापतीमुळे बाहेर होत आहेत. त्यामुळे चेन्नईची चिंता वाढतच आहे.

मुकेशची आई बऱ्याच काळापासून आजारी

मुकेश चौधरीची आई, प्रेम देवी, बऱ्याच काळापासून आजारी होत्या. गेल्या वर्षभरापासून त्यांच्यावर मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयात उपचार सुरू होते. चेन्नई सुपर किंग्सने 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका भावनिक पोस्टद्वारे ही दुःखद बातमी शेअर केली. सीएसकेने लिहिले, "सीएसके परिवार मुकेश चौधरीच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहे. या अत्यंत कठीण काळात आम्ही मुकेश आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत आहोत आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करतो."

आईच्या निधनाची बातमी मिळताच मुकेश चौधरी टीम कॅम्प सोडून भिलवाड्याकडे रवाना झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या आईवर त्याच्या वडिलोपार्जित घराजवळ, गढवालों का खेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुकेशने आईच्या चितेला अग्नी दिला. या दुःखद प्रसंगी त्याचा भाऊ डॉ. राजेश चौधरी देखील उपस्थित होता.

मुकेशची यंदाच्या हंगामातील कामगिरी

मुकेश चौधरीला या हंगामातील पहिली संधी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यात मिळाली. दुखापतग्रस्त खलील अहमदच्या जागी संघात आलेल्या मुकेशने अवघ्या दोन षटकांत २१ धावा देऊन दोन महत्त्वपूर्ण बळी घेतले. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात त्याने ट्रॅव्हिस हेडला माघारी धाडले. तर पुढच्याच चेंडूवर इशान किशनला बाद केले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: CSK Hit Before MI Clash; Player's Mother Passes Away

Web Summary : CSK's Mukesh Choudhary's mother passed away, impacting the team before the MI match. He returned home, missing the game. She was ill and treated in Mumbai. CSK expressed condolences. He took two wickets in a previous game.
टॅग्स :आयपीएल २०२६मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सऑफ द फिल्डमृत्यूमृत्यू