शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 14:47 IST

Congress News: आपल्या देशाचा स्वाभिमान विकून ही कोणती मैत्री ते जपत आहेत? देशाचा सन्मान जपण्यासाठी ताठ कणा लागतो!, अशी टीका करण्यात आली आहे.

Congress News: अमेरिकेतील जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबाबत केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटल्याचे म्हटले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये प्रसिद्ध रेडिओ होस्ट मायकल सॅव्हेजने, मुलांना जन्मसिद्ध नागरिकत्व मिळावे, यासाठी परदेशी नागरिक अमेरिकन कायद्यांचा फायदा घेण्यासाठी शेवटच्या महिन्यात अमेरिकेत येतात, असा दावा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानावरून आता काँग्रेसनेभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. 

स्थलांतरित लोक चीन, भारत किंवा या पृथ्वीवरील इतर कोणत्याही 'नरकसदृश' ठिकाणांहून अमेरिकेत येतात; इथे मुले जन्माला घालतात, जी अमेरिकेचे नागरिक होतात, त्यानंतर ते चीन किंवा भारतातून आपल्या संपूर्ण कुटुंबाला येथे बोलावून घेतात. हे पाहण्यासाठी तुम्हाला फार दूर जाण्याची गरज नाही. आता येथे इंग्रजी भाषा बोलली जात नाही. आजच्या काळात येथे येणाऱ्या स्थलांतरितांच्या वर्गामध्ये या देशाप्रती निष्ठा जवळजवळ उरलेलीच नाही आणि पूर्वी मात्र परिस्थिती अशी नव्हती, असे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी, 'जन्मसिद्ध नागरिकत्व' या मुद्द्यावर सुरू असलेल्या एका व्यापक चर्चेचा संदर्भ दिला. 

पंतप्रधान मोदी यांनी तीव्र आक्षेप नोंदवायला हवा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताला 'नरक' म्हटले आहे, हे विधान अत्यंत अपमानजनक आणि भारतविरोधी आहे. यामुळे प्रत्येक भारतीयाला दुःख झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी बोलून आपला तीव्र आक्षेप नोंदवला पाहिजे. मात्र, मोदींची आतापर्यंतची कामगिरी पाहता, ते ट्रम्प यांच्याशी बोलू शकतील याची शक्यता कमी आहे. ट्रम्प सातत्याने भारताबद्दल अपमानजनक वक्तव्ये करतात आणि मोदी गप्प बसून ऐकतात. नरेंद्र मोदी एक कमकुवत पंतप्रधान आहेत आणि त्याचे परिणाम संपूर्ण देश भोगत आहे, असे काँग्रेस पक्षाने एक्सवर पोस्टवर म्हटले आहे. 

भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान

काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत एक्सवर पोस्ट करून केंद्र सरकरावर टीका केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख 'नरक' असा करणे हा १४० कोटी भारतीयांचा अपमान आहे! पण दुर्दैव असं की, स्वतःला 'विश्वगुरू' म्हणवणारे पंतप्रधान मोदी या अपमानावर गप्प आहेत. आपल्या देशाचा स्वाभिमान विकून ही कोणती मैत्री ते जपत आहेत? ट्रम्प यांच्यासमोर पंतप्रधान मोदींची ५६ इंच छाती आणि तिची ताकद कुठे जाते? भारत देश एका कमकुवत नेतृत्वामुळे अपमान सहन करत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष सातत्याने भारताचा अपमान करतात आणि भारत शांतपणे ऐकून घेतो? साधा आक्षेप घेतला जात नाही, निषेध नोंदवला जात नाही.. परदेशात जाऊन मिठ्या मारल्याने देश मोठा होत नाही, देशाचा सन्मान जपण्यासाठी ताठ कणा लागतो!, या शब्दांत वडेट्टीवार यांनी निशाणा साधला.

दरम्यान, जन्मसिद्ध नागरिकत्वाबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले की, जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या मुद्द्यावर आपल्या देशाच्या विरोधात निकाल दिला आणि तसे होण्याचीच शक्यता अधिक आहे, तर अमेरिकेला प्रचंड आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल; परंतु, त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, अमेरिकेला आपली 'प्रतिष्ठा' गमवावी लागेल!

 

English
हिंदी सारांश
Web Title : Congress Slams PM Modi's Silence on Trump's 'Hell' Remark About India

Web Summary : Congress criticizes PM Modi for his silence after Trump's derogatory 'hell' remark about India. The party alleges Modi's weakness is causing national humiliation, demanding a strong response to protect India's dignity and protest Trump's constant insults.
टॅग्स :congressकाँग्रेसAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार