शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 15:40 IST

भारत आणि रशिया यांच्यातील रेलोस करार फक्त लष्करी तैनातीपुरता मर्यादित नाही, तर तो दोन्ही देशांमधील सहकार्य आणि समन्वय देखील मजबूत करणार आहे.

मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि रशिया यांच्यातील 'रेलोस' महत्त्वपूर्ण लष्करी कराराबाबत नवीन माहिती समोर आली आहे. हा करार मॉस्कोने सार्वजनिक केला आहे. या करारावर गेल्या वर्षी स्वाक्षरी झाली होती, पण आता त्याची पूर्ण व्याप्ती अधिक स्पष्ट होत आहे. या करारानुसार, भारत आणि रशिया एकमेकांच्या प्रदेशात आपले सैन्य, युद्धनौका आणि लष्करी विमाने तैनात करू शकतात. दोन्ही देशांमधील संरक्षण संबंधांमधील हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. या करारामुळे पाकिस्तान तणावात आहे. 

तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला

या कराराचे परिणाम आर्क्टिकपासून हिंद महासागरापर्यंत होऊ शकतात. यामुळे भारत आणि रशिया यांच्यातील दीर्घकालीन सहकार्य अधिक दृढ होईल. तसेच, हा करार जगाला, पाकिस्तानच्या जवळ आलेल्या अमेरिकेला एक स्पष्ट संदेश देत असल्याचे तज्ञांचे मत आहे. करारानुसार, भारत आणि रशिया एकमेकांच्या प्रदेशात जास्तीत जास्त ३,००० सैनिक, ५ युद्धनौका आणि १० लष्करी विमाने तैनात करू शकतात. म्हणजेच गरज पडल्यास दोन्ही देश एकमेकांच्या तळांवरून आपली लष्करी संसाधने चालवू शकतील.

भारत-रशिया संबंध आणखी मजबूत

दिल्लीतील 'सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीज'चे माजी महासंचालक, एअर मार्शल अनिल चोप्रा यांच्या मते, जानेवारी २०२६ मध्ये अंमलात आलेला हा करार, भारत आणि रशियाची आपले संबंध आणखी मजबूत करतो. हा करार भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाला अधिक बळकट करतो आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशात शक्ती संतुलन राखण्यास मदत करतो. सामरिकदृष्ट्या, हा करार दोन्ही देशांसाठी फायदेशीर आहे. यामुळे रशियाला हिंद महासागरात प्रवेश मिळतो, तर भारताला आर्क्टिक आणि पॅसिफिकमध्ये आपली उपस्थिती वाढवण्याची संधी मिळते. हे सहकार्य यापुढे केवळ बंदरांपुरते मर्यादित राहणार नाही. उलट, दोन्ही देश एकमेकांच्या प्रदेशात दीर्घकाळासाठी आपली लष्करी उपस्थिती कायम ठेवू शकतील.

हा करार रशियासाठीही महत्त्वाचा आहे, कारण रशियाला उष्ण-पाण्याच्या बंदरांची गरज आहे. या करारामुळे रशिया आपले सैन्य आणि उपकरणे भारतात किंवा अंदमान आणि निकोबार बेटांवर तैनात करू शकेल, यामुळे त्याला हिंद महासागर क्षेत्रात थेट प्रवेश मिळेल. यामुळे भारताला रशियामार्फत आर्क्टिक आणि पश्चिम पॅसिफिकमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होईल. या करारामुळे दोन्ही देशांच्या सैन्यांमधील समन्वयही वाढेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : India-Russia Military Pact Rattles Pakistan Amidst Regional Tensions

Web Summary : India and Russia's 'RELOS' military pact allows troop, warship, and aircraft deployment in each other's territories. It strengthens defense ties, potentially impacting the Arctic to the Indian Ocean. Pakistan is reportedly concerned as the agreement allows for significant military presence.
टॅग्स :russiaरशियाIndiaभारतIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान