शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 17:05 IST

Ulhasnagar Municipal Corporation politics : उल्हासनगर महानगरपालिकेत भाजप आणि शिंदे सेनेतील वाद टोकाला पोहोचला आहे. आयुक्त कार्यालयाबाहेर भाजप नगरसेवकांचा धिंगाणा, महापौर पतीवर आरोप आणि राष्ट्रगीताचा अवमान; वाचा उल्हासनगरमधील राजकीय पेच.

- सदानंद नाईक 

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिका महासभा संपल्यानंतर आयुक्ताना भेटण्यासाठी गेलेले भाजपाचे गटनेता राजेश वधारिया यांना एन्ट्री देऊन सोबत असलेल्या पक्षाच्या नगरसेवकाना बाहेर थांबविले. मात्र त्या पाठोपाठ शिंदेसेनेचे गटनेते अरुण अशान यांच्या सोबत महापौर पती कमलेश निकम यांना एन्ट्री दिल्याचा राग भाजप नगरसेवकांना येऊन त्यांनी धिंगाणा घालत महापौर पतीला टार्गेट केले आहे.

 उल्हासनगर महापालिकेत भाजप व शिंदेसेनेची महायुती असताना त्यांच्यातील वाद वारंवार चव्हाट्यावर येत आहेत. गेल्या महासभेत लाडकी विध्यार्थिनी योजनेला भाजपाने सुचविलेले ज्योतीबाई फुले यांचे नाव डावलून माजी आमदार ज्योती कलानी यांचे नाव देण्यात आले. यावरून दोन्ही पक्षातील वाद समोर आला होता. बुधवारी भाजपाच्या नगरसेवकांनी प्रवेशद्वारावर डम्पिंग हटाव प्रकरणी महापौरचा रस्ता अडवत महासभेत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनावरून दोन्ही पक्षातील वाद चव्हाट्यावर आले. तर महासभा संपण्यापूर्वी महापौर अश्विनी निकम यांनी विरोधी बाकावरील एकमेव काँग्रेसच्या नगरसेविका अंजली साळवे यांना विरोधी पक्ष नेते पदी घोषित केले. आम्हाला विश्वासात न घेता शिंदेसेना परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप यावेळी भाजप नगरसेवकांनी केला.

 महापालिका महासभा संपल्यानंतर भाजपाचे गटनेते राजेश वधारिया हे पक्षाच्या काही नगरसेवकासह आयुक्त मनिषा आव्हाळे यांना भेटण्यासाठी गेले. मात्र सुरक्षारक्षकांनी फक्त वधारिया यांना एन्ट्री देऊन इतर नगरसेवकांना बाहेर थांबाविले. मात्र त्यापाठोपाठ शिवसेना गटनेते अरुण अशांन हे महापौरांचे पती कमलेश निकम यांच्यासह आयुक्ताना भेटण्यास गेले. महापौरांचे पती नगरसेवक नसताना व इतर पदे त्यांच्याकडे नसताना त्यांना जाऊ का दिले? असा प्रश्न व भाजप नगरसेवकानी करीत आयुक्त कार्यालया बाहेर धिंगाणा घालत निकम यांना बाहेर काढण्याची मागणी केली. अखेर पोलीस संरक्षणात कमलेश निकम यांना बाहेर काढले. 

महापौरांची प्रतिनिधी म्हणून गेलो

शिंदेसेनेचा कार्यकर्ता व महापौर अश्विनी निकम यांचा प्रतिनिधी म्हणून आयुकाकडे गेलो होतो. मात्र भाजपाने त्याचा अपप्रचार केला असून झालेला प्रकार पक्ष नेतृत्वाकडे मांडणार आहे.

- कमलेश निकम, महापौरांचा पती

महापौराकडून राष्ट्रागीताचा केला अपमान 

महासभा संपल्याचे जाहीर केल्यावर, राष्ट्रगीत गायनास सुरवात झाली. यावेळी महापौर अश्विनी निकम हसत होत्या. असा आरोप भाजपचे गटनेते राजेश वधारिया यांच्यासह अन्य भाजपा नगरसेवाकांनी केला. 

- राजेश वधारिया, भाजपा गटनेता महापालिका

English
हिंदी सारांश
Web Title : Ulhasnagar: Mayor's Husband Targeted by BJP Over Commissioner's Office Entry?

Web Summary : Ulhasnagar BJP corporators protested after the mayor's husband was allowed to meet the commissioner while they were kept waiting. This follows previous disputes between BJP and Shiv Sena (Shinde faction) over naming schemes and project approvals, escalating tensions within the ruling coalition.
टॅग्स :Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ulhasnagarउल्हासनगरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा