बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू होते. तर दुसरीकडे २०२९ च्या निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू होती. बारामती विधानसभा विधानसभा मतदारसंघात जय पवार निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान, या चर्चेवर जय पवार यांनी स्वत: स्पष्टीकरण दिले. त्यांनी या चर्चेला पूर्णविराम देत 'कार्यकर्ता' म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
२०२९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीबाबत विचारले असता जय पवार म्हणाले, "लोकांची इच्छा आहे की मी उमेदवारी घ्यावी, पण माझी इच्छा लोकांसोबत कार्यकर्ता म्हणून काम करण्याची आहे. मी आधीपासूनच सांगत आलोय की मला पक्षासाठी एक छोटा कार्यकर्ता म्हणून राहायचं आहे. अगदी नगराध्यक्ष पदासाठी जेव्हा माझं नाव आलं होतं, तेव्हाही मी दादांना स्पष्ट सांगितलं होतं की मला पदापेक्षा कार्यकर्ता म्हणून काम करण्यात जास्त रस आहे.
कुटुंब एकत्र राहण्यावर भाष्य
युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांच्या वक्तव्यांचा संदर्भ देत जय पवार यांनी कौटुंबिक एकोप्यावरही भाष्य केले. "युगेंद्र दादा जे म्हणाले की आपण एकमेकांविरुद्ध लढायला नको, ते मलाही पटतंय. कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहिला पाहिजे, ही आमचीही इच्छा आहे. 'पवार विरुद्ध पवार' असा सामना व्हावा असं आम्हालाही वाटत नाही," असेही जय पवार म्हणाले. रोहित दादा असे म्हणाले पवार विरुद्ध पवार होणार अशी आमची इच्छा नाही असेही जय पवार म्हणाले.
यावेळी जय पवार यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतही अपडेट दिली. "माझं रेवतीशी बोलणं झालं आहे, आजोबांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
"सकाळी चांगलं मतदान झालं, दुपारी उन्हामुळे वेग थोडा मंदावला होता, पण ४ वाजेनंतर पुन्हा मतदानाचा टक्का वाढत आहे. मला वाटतं की एकूण साठ टक्के मतदान होईल, असेही पवार म्हणाले.
Web Summary : Jay Pawar clarifies he's not vying for candidacy in the 2029 elections. He prefers working as a party worker. He also emphasized family unity and shared that Sharad Pawar has been discharged from the hospital.
Web Summary : जय पवार ने स्पष्ट किया कि वह 2029 के चुनावों में उम्मीदवारी नहीं चाहते। वह पार्टी कार्यकर्ता के रूप में काम करना पसंद करते हैं। उन्होंने पारिवारिक एकता पर भी जोर दिया और बताया कि शरद पवार को अस्पताल से छुट्टी मिल गई है।