शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 20:19 IST

Baramati bypoll election: बारामतीत पाच वाजेपर्यंत ५२.४४ टक्के मतदान

बारामती - अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीत झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५२.४४ टक्के मतदान झाले. पोटनिवडणुकीसाठी पवार यांच्यासह २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, विरोधी उमेदवारांमध्ये एकही राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार रिंगणात नसल्याने निवडणूक पूर्णपणे एकतर्फी पार पडल्याचे चित्र आहे. विरोधी उमेदवारांनी केवळ उमेदवारी कायम ठेवली, मात्र प्रचारात सक्रिय सहभाग घेतला नाही. सकाळी ९ वाजेपर्यंत अवघे ८.१ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के मतदान झाले. दुपारी १ वाजेपर्यंत ३१.९१ टक्के, तर ३ वाजेपर्यंत ४०.३६ टक्के मतदानाची टक्केवारी होती. ५ वाजेपर्यंत हे मतदान ५२.४४ टक्क्यांपर्यंत पोहोचले.स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह त्यांचे दोन्ही पुत्र, पार्थ पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती तालुक्यात माळेगावसह काही मतदान केंद्रांना भेटी देत मतदारांशी संवाद साधला. तसेच जय पवार यांनी बारामती मतदारसंघात दिवसभर विविध मतदान केंद्रांना भेटी देत परिस्थितीवर लक्ष ठेवले.खासदार सुप्रिया सुळे यांनी मुलगी रेवती, रणजित पवार, शुभांगी पवार यांच्यासह शहरातील रिमांड होम येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तसेच त्यांचे पुत्र जय पवार यांनी जळोची येथे मतदान केले. युगेंद्र पवार, त्यांचे वडील श्रीनिवास पवार आणि मातोश्री शर्मिला पवार यांनी काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला.दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदान करण्यापूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत अभिवादन केले. तसेच काटेवाडी येथे अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांचे मतदानापूर्वी आशीर्वाद घेतले.दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा फैसला ४ मे रोजी होणार आहे. ‘रेकॉर्डब्रेक’ मतदानासाठी यंदा राष्ट्रवादीने ताकद पणाला लावली आहे. प्रखर उन्हाळा आणि एकतर्फी निवडणुकीमुळे मतदानाचे प्रमाण घटल्याचे मानले जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Baramati Bypoll: Voter Turnout Drops; Sunetra Pawar's Fate on May 4

Web Summary : Baramati bypoll saw 52.44% turnout. Sunetra Pawar and family voted. Low turnout attributed to heat and one-sided contest. Results on May 4.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBaramatiबारामतीElectionनिवडणूक 2026Puneपुणे