आयपीएल २०२६ स्पर्धेतील ३३ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील वानखेडेच्या मैदानातील सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मुकेश चौधरीचं नाव पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या सामन्याआधी दु:खाचा डोंगर कोसळला असताना त्याने संघासाठी आपले कर्तव्य बजावण्यासाठी मैदानात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले. या धक्क्यातून सावरत तो मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळण्यासाठी तयार झाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आईच्या निधनानंतर घरी परतला, अंत्यसंस्कार उरकून पुन्हा संघात सामील झाला अन्..
मंगळवारी, २१ एप्रिल रोजी मुकेश चौधरी यांच्या आईचं निधन झालं. ही दु:खद बातमी समजताच ते तात्काळ आपल्या घरी परतला. या परिस्थितीत Chennai Super Kings चा संघ त्यांच्याशिवायच मैदानात उतरेल, असं वाटत होतं. मात्र, आईच्या अंत्यसंस्कारानंतर मुकेश चौधरी काही तासांतच पुन्हा संघात परतला. एवढेच नाही तर त्याने काळजावर दगड ठेवून मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात खेळण्याचा खंबीर निर्णय घेतला. आईच्या निधनानंतर मैदानात उतरण्याचा निर्णय घेणं कोणत्याही खेळाडूसाठी सोपं नसतं. मात्र मुकेश चौधरी याने या मोठ्या धक्क्यातून सावरत संघासाठी खेळण्याला पसंती दिली. त्यांच्या या जिद्दीला आणि खेळाप्रती समर्पणाला जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी सलाम केला आहे.
CSK कडून श्रद्धांजली, काळ्या फिती बांधून मैदानात उतरले खेळाडू
चेन्नई सुपर किंग्सचने आपल्या अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करताना म्हटले आहे की, “मुकेश चौधरी यांच्या आईच्या निधनाबद्दल CSK परिवार शोक व्यक्त करतो. या कठीण काळात आम्ही मुकेश आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहोत.” मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात CSK चे खेळाडू काळ्या फिती बांधून मैदानात उतरल्याचेही पाहायला मिळाले.
आयपीएलमधील कामगिरी
चेन्नई सुपर किंग्सकडून यंदाच्या हंगामात मुकेश चौधरी एक सामना खेळला आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने २१ धावा खर्च करत २ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने १७ सामन्यात १९ विकेट्स घेतल्या असून ४६ धावा खर्च करत ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
Web Summary : Despite his mother's recent death, Mukesh Choudhary bravely played for CSK against MI, returning quickly after funeral rites. CSK players wore black armbands as a tribute. His dedication is praised.
Web Summary : मां की मृत्यु के बावजूद, मुकेश चौधरी ने साहसपूर्वक CSK के लिए MI के खिलाफ खेला, अंतिम संस्कार के बाद जल्दी लौटे। CSK खिलाड़ियों ने श्रद्धांजलि के रूप में काली पट्टी बांधी। उनके समर्पण की सराहना की जाती है।