'हेल-होल' वादानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे 'हृदयपरिवर्तन' झाले आहे. या वादानंतर, ट्रम्प यांनी गुरुवारी भारताचं भरभरून कौतुक केले. एवढेच नाही तर, भारताचे नेतृत्व एक 'अतिशय चांगला मित्र' करत असल्याचे ते म्हणाले. नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाचे प्रवक्ते ख्रिस्तोफर एल्म्स म्हणाले, ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख एक 'महान देश' असा केला. तसेच, भारताच्या नेत्यासोबत आपली घनिष्ठ वैयक्तिक मैत्री असल्याचेही ते म्हणाले."
काय म्हणाले ट्रम्प? -ट्रम्प म्हणाले, "भारत एक महान देश आहे. ज्याचे नेतृत्व माझा एक अत्यंत चांगला मित्र करत आहे." ट्रम्प यांचे हे विधान 'हेल-होल' वादाच्या पार्श्वभूमीवर आले आहे. एक दिवस आधीच, ट्रम्प यांनी अमेरिकन राजकीय भाष्यकार आणि रेडिओ होस्ट मायकल सॅव्हेज यांची एका पॉडकास्टमधील वर्णद्वेषी टिप्पणी रीपोस्ट केली होती. ज्यामध्ये त्यांनी भारत, चीन आणि इतर देशांना 'हेल-होल' (नरक) असे म्हटले होते. यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना, "मी केवळ एवढेच सांगेन की, आम्ही काही बातम्या बघितल्या आहेत."
काय आहे 'हेल-होल' वाद?हा वाद एका दिवसापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन रेडिओ होस्ट माईकल सॅव्हेज यांच्या पॉडकास्टवरील एक वर्णद्वेषी टिप्पणी रीपोस्ट केल्यामुळे सुरू झाला होता. या टिप्पणीमध्ये भारत, चीन आणि इतर काही देशांना 'नरकाचा खड्डा' (Hell-Holes) असे संबोधण्यात आले होते. माईकल सॅव्हेज यांनी अमेरिकेच्या 'जन्मसिद्ध नागरिकत्व' कायद्यात बदल करण्याची मागणी करत, आशियाई देशांतील लोक केवळ नागरिकत्वासाठी अमेरिकेत येतात. हे 'लॅपटॉपवाले गुंडे' आहेत, असे म्हणत, त्यांनी देशाला लुटल्याचा आणि अमेरिकन ध्वजाचा अपमान केल्याचा दावा केला होता.
ट्रम्प यांनी सॅव्हेज यांच्या 'सॅव्हेज नेशन' पॉडकास्टचा व्हिडिओ शेअर केला होता. मात्र, आता भारताला महान देश म्हणत आणि मोदींचा चांगला मित्र म्हणत, त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.
Web Summary : After facing criticism for a 'hell-hole' remark, Trump lauded India as a 'great country' led by a 'very good friend,' referring to Modi. He had previously shared a controversial post criticizing Asian countries, sparking backlash.
Web Summary : 'हेल-होल' टिप्पणी के बाद आलोचना का सामना करने पर, ट्रंप ने भारत को 'महान देश' बताया और मोदी को 'बहुत अच्छा दोस्त' कहा। इससे पहले उन्होंने एशियाई देशों की आलोचना करते हुए एक विवादास्पद पोस्ट साझा किया था, जिससे प्रतिक्रिया हुई थी।