Chennai Super Kings Sign Akash Madhwal As A Replacement For Ayush Mhatre : इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामात पाच वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला दुखापतीचं ग्रहण लागले आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबईकर युवा बॅटर आयुष म्हात्रेला दुखापत झाल्यामुळे तो उर्वरित स्पर्धेला मुकणार आहे. त्याच्या बदली खेळाडूच्या रुपात CSK च्या संघाने अजब गजब डाव खेळला आहे. कारण फलंदाजाच्या बदली खेळाडूच्या रुपात त्यांनी मुंबई इंडियन्सच्या माजी गोलंदाज आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आकाश मधवालची वाइल्ड कार्ड एन्ट्री
आयुष म्हात्रे हा दमदार फॉर्ममध्ये होता. पण १८ एप्रिलला सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात स्नायू दुखापतीच्या दुखापतीमुळे त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी आता चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने ३२ वर्षीय गोलंदाज आकाश मधवाल याला संधी दिली आहे.
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
याआधी तो MI सह RR च्या ताफ्यातून खेळताना दिसला
उत्तराखंडचा ३२ वर्षी जलदगती गोलंदाज आकाश मधवाल याने IPL मध्ये मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. आकाशने २०२३ च्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. २०२४ च्या हंगामातही तो MI सोबत होता. गत हंगामात राजस्थान रॉयल्सच्या संघाने त्याला आपल्या संघात घेतले. पण यंदाच्या हंगामाआधी त्याने त्याला रिलीज केले. मिनी लिलावात अनसोल्ड राहिलेल्या या भिडूला आता चेन्नई सुपर किंग्सनं ३० लाख या मूळ किंमतीसह आपल्या संघात घेतले आहे.
५ धावांत ५ विकेट्सचा डाव
आयपीएलमध्ये आतापर्यंत आकाश मधवाल याने तीन हंगामात १७ सामने खेळले असून त्याच्या खात्यात २३ विकेट्स जमा आहेत. ५ धावा खर्च करून ५ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. मुंबई इंडियन्सकडून लखनौ विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात त्याने ही कामगिरी केली होती.
फलंदाजाच्या बदली खेळाडूच्या रुपात गोलंदाजाला का दिली संधी
आयुष म्हात्रे आधी खलिल अहमद आणि नॅथन एलिस यांनी दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली होती. नॅथनच्या जागी CSK नं स्पेन्सर जॉन्सन याला संघात सामील करून घेतले. आता आयुष म्हात्रेच्या बदली खेळाडूच्या रुपात त्यांनी खलिल अहमदची उणीव भरून काढण्याचा डाव खेळल्याचे दिसते.
Web Summary : Chennai Super Kings signed Akash Madhwal, formerly of Mumbai Indians, to replace the injured Ayush Mhatre. Mhatre's injury prompted CSK to bring in the bowler, strengthening their squad after earlier injury setbacks. Madhwal, previously with MI and RR, joins CSK for his base price.
Web Summary : चेन्नई सुपर किंग्स ने घायल आयुष म्हात्रे की जगह मुंबई इंडियंस के पूर्व खिलाड़ी आकाश मधवाल को टीम में शामिल किया है। म्हात्रे की चोट के कारण सीएसके ने गेंदबाज को शामिल किया, जिससे पहले चोटों के झटकों के बाद उनकी टीम मजबूत हुई। मधवाल पहले एमआई और आरआर के साथ थे।