अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तिसऱ्यांदा एकतर्फी शस्त्रसंधी वाढवल्यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनी तीन मालवाहू जहाजांवर हल्ला केला. इतकंच नाही, तर दोन जहाज इराणच्या आयआरजीसीने ताब्यात घेतली. यातील एक जहाज भारतीय आहे. इपॅमिनोंडास हे जहाज गुजरातमधील मुद्रा बंदरावर येणार होते. पण ते आता इराणी लष्कराच्या ताब्यात आहे. त्याचा एक व्हिडीओ आयआरजीसीकडून शेअर करण्यात आला आहे.
लायबेरियाचा ध्वज असलेले इपॅमिनोंडास हे मालवाहू जहाज भारताकडे निघाले होते. त्याच्यावर इराणच्या नौदलाने हल्ला केला. हल्ल्यानंतर नौदलाने मॉस्किटो फ्लीट म्हणजे अतिशय वेगाने धावणाऱ्या बोटीतून त्याचा पाठलाग केला. त्यानंतर सशस्त्र इराणी जवान जहाजामध्ये चढले.
इराणी लष्कराच्या कारवाईचा व्हिडीओ बघा
इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शस्त्रसंधी वाढवण्यात आल्यानंतर केलेली ही पहिली कारवाई होती. इपॅमिनोंडास हे मालवाहू जहाज दुबईवरून गुजरातमध्ये येणार होते.
ओमान देशाच्या ईशान्येला होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये १५ नॉटिकल मैल अंतरावर असताना इराणी सैन्याने हल्ला केला. या जहाजासोबत आणखी एक जहाज होते, पनामाचा ध्वज असलेले जहाजही इराणने ताब्यात घेतले. ही दोन्ही जहाजे इराणच्या किनाऱ्यावर नेण्यात आले.
Web Summary : Iranian forces seized the Indian cargo ship 'Epaminondas' near the Strait of Hormuz. The ship, en route to Gujarat, was captured by IRGC forces after a high-speed pursuit. This action followed the extension of arms embargo by the US.
Web Summary : ईरानी बलों ने होर्मुज जलडमरूमध्य के पास भारतीय मालवाहक जहाज 'एपमिनोंडास' को जब्त कर लिया। गुजरात जा रहे जहाज को आईआरजीसी बलों ने हाई-स्पीड पीछा करने के बाद पकड़ लिया। यह कार्रवाई अमेरिका द्वारा हथियारों के प्रतिबंध के विस्तार के बाद हुई।