Join us
Daily Top 2 Weekly Top 5

उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 17:39 IST

1 / 9
उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगड खाणं हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. कलिंगड शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतं आणि चवीलाही गोड असतं. पण कलिंगड किडनीसाठी खरोखर फायदेशीर आहे का? यामुळे किडनीला काही इजा तर होत नाही ना? याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
2 / 9
दिल्लीतील जीटीबी हॉस्पिटलच्या माजी डायटिशियन डॉ. अनामिका गौर यांनी याबाबत माहिती दिली आहे. योग्य प्रमाणात कलिंगड खाणं हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं असं म्हटलं आहे.
3 / 9
डॉक्टरांच्या मते, कलिंगड खाल्ल्याने किडनीला नुकसान होत नाही, उलट ते फायदेशीर ठरू शकते. कलिंगडात सुमारे ९०% पाणी असते, ज्यामुळे किडनी हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
4 / 9
व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं, जे त्वचेसाठीही उत्तम आहे. तसेच यामध्ये पोटॅशियम देखील आढळते, जे आरोग्यासाठी गरजेचं आहे. कलिंगडमध्ये अमिनो ॲसिडचं प्रमाण चांगलं असतं. हे ॲसिड किडनीवर येणारा ताण कमी करण्यास मदत करते.
5 / 9
कलिंगडमधील घटक किडनी स्टोनचा धोका कमी करण्यास मदत करतात. किडनीचे रुग्ण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने मर्यादित प्रमाणात कलिंगडाचे सेवन करू शकतात.
6 / 9
ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास देखील मदत करतं, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. कलिंगड हे केवळ एक चविष्ट फळ नाही तर संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर असलेलं एक हेल्दी सुपरफूड आहे.
7 / 9
जास्त अन्न खाल्ल्यानंतर लगेच कलिंगड खाणं हानिकारक ठरू शकतं. पचन प्रक्रिया मंदावू शकते, ज्यामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की कधीही कलिंगड आणि अन्न एकत्र खाऊ नये.
8 / 9
सकाळी किंवा संध्याकाळी नाश्त्यात कलिंगड खाऊ शकता. जर तुम्ही जेवणाच्या वेळी कलिंगड खात असाल तर तुम्ही जेवण स्किप करू शकता.
9 / 9
ज्या लोकांना सर्दी किंवा घसा खवखवण्याची समस्या आहे त्यांनी कलिंगड खाणं टाळावं. याचा घशाला त्रास होऊ शकतो आणि बरं होण्यास वेळ लागू शकतो. जेव्हा जेव्हा हवामान बदलत असेल तेव्हा कलिंगड खाणं टाळावं. कलिंगड आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु ते योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
टॅग्स : अन्नफळेआरोग्यहेल्थ टिप्स