Paratwada nude video case news: अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील बहुचर्चित व्हिडिओ व लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमदभोवती पोलिसांचा फास अधिकच घट्ट झाला आहे. सोशल मीडियावर पिस्तूल दाखवत 'रील' बनवून दहशत माजवणाऱ्या या नराधमाचे कारनामे उघड होत असतानाच, आता त्या रिलमध्ये वापरलेले महागडे वाहन आणि दोन पिस्तूल परतवाडा पोलिसांनी जप्त केली आहेत. ही शस्त्रे आणि वाहन अचलपूर तालुक्यातील सावळी येथील राजेश प्रजापती (वय ५०) यांच्या मालकीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अयानने रीलमध्ये वापरलेली रिव्हॉल्व्हर केवळ शोभेची होती की जीवघेणी, याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी ती जप्त केली आहे. प्राथमिक पाहणीत या पिस्तुलांचा 'बोर' अर्थात व्यास कमी असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी कोणताही धोका न पत्करता दोन्ही रिव्हॉल्व्हर तपासणीसाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांकडे पाठवली आहेत. या अहवालानंतर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.
अयानच्या 'त्या' लॅपटॉपमध्ये काय?
पोलिसांनी आरोपी एहफाज खानकडून लॅपटॉप, टॅब आणि हार्ड डिस्क जप्त केली असून, उद्याच्या सुनावणीत न्यायालय या आरोपींच्या कोठडीत वाढ करणार की त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी गठित एसआयटीने आठ आरोपींना अटक केली आहे. पैकी चार आरोपींच्या पोलिस कोठडी २३ ला संपणार आहे. त्यामुळे पोलिस त्या चौघांच्या वाढीव कोठडीची मागणी करतात की त्यांची कारागृहात रवानगी होते, ते गुरूवारी दुपारी स्पष्ट होईल.
मानवच्या फ्लॅटमध्येच सुरू होते लैंगिक शोषण
अमरावती येथील फ्लॅटमधील भाडेकरू मानव सुगंधे (२०, रा. आर्वी) याच्यासह एहफाज खान, मो. इमरान आणि शेख नावेद (तिघे रा. अचलपूर) यांचा समावेश आहे. अयान याने पीडितेचे लैंगिक शोषण मानव सुगंधेच्या अमरावती येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये केल्याची कबुली दिली होती.
Web Summary : Ayan Ahmed, accused in a Paratwada case, faces intensified scrutiny. Police seized expensive cars and two pistols used in his social media 'reel', belonging to Rajesh Prajapati. Forensics examine the weapons. A laptop, tab, and hard disk were seized from another accused. The probe continues into alleged sexual exploitation.
Web Summary : परातवाड़ा मामले के आरोपी अयान अहमद की जांच तेज हो गई है। पुलिस ने राजेश प्रजापति से सोशल मीडिया 'रील' में इस्तेमाल की गई महंगी कारें और दो पिस्तौल जब्त कीं। फोरेंसिक हथियारों की जांच कर रहे हैं। एक अन्य आरोपी से लैपटॉप, टैब और हार्ड डिस्क जब्त की गई। कथित यौन शोषण की जांच जारी है।