अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची नौसेना उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला असला, तरी इराण होर्मुझमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवून आहे. इराणच्या जवळपास १५० हून अधिक युद्धनौका अमेरिकेने बुडविल्या आहेत. एक तर भारतातून निशस्त्र परतत होती, तिला श्रीलंकेजवळ नेस्तनाभूत करण्यात आले होते. असे काय आहे की इराणच्या ताकदीला घाबरून अमेरिकेच्या युद्धनौका होर्मुझमध्ये घुसू शकत नाहीत.
इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सकडे अजूनही निम्मी ताकद शिल्लक आहे. बुधवारी इराणने दोन व्यापारी जहाजांना आपल्या ताब्यात घेऊन हे सिद्ध केले. यामध्ये त्यांनी अतिवेगवान लहान नौकांचा वापर केला, ज्या मोठ्या युद्धनौकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. अमेरिकन गुप्तचर माहितीनुसार, इराणकडे हजारोंच्या संख्येने लहान आणि वेगवान नौका आहेत. या नौकांवर अँटी-शिप मिसाईल्स आणि सैनिक तैनात आहेत.
एकटी लहान नौका अमेरिकन वॉरशिपचा सामना करू शकत नाही, मात्र जर डझनावारी नौकांनी मिळून एकाच वेळी ड्रोन आणि जमिनीवरील मिसाईल्ससह हल्ला केला, तर त्या मोठ्या जहाजांना जेरीस आणू शकतात.
होर्मुझ नियंत्रणासाठी इराणची 'मास्टर प्लॅनिंग'इराणच्या संसदेत होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे नियंत्रित करण्यासाठी एक विशेष प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. खासदार फदाहोसेन मालेकी यांनी 'तेहरान टाइम्स'ला दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च सुरक्षा परिषद या प्रस्तावाचा आढावा घेत आहे. यामुळे आगामी काळात या जलमार्गावरून होणारी जागतिक तेल वाहतूक इराणच्या मर्जीवर अवलंबून राहू शकते.
अमेरिकन नाकेबंदी फेल? अमेरिकेने १३ एप्रिलपासून इराणच्या बंदरांवर नौदल नाकेबंदी केली असली, तरी इराणचे तेल टँकर्स अजूनही ये-जा करत आहेत. 'वॉर्टेक्सा' या विश्लेषण कंपनीच्या अहवालानुसार गेल्या एका आठवड्यात इराणशी संबंधित ३४ तेल टँकर्स या मार्गावरून गेले आहेत. यापैकी १९ टँकर्स खाडीबाहेर पडले, तर १५ टँकर्स आत शिरले आहेत.
इराणचा प्रत्यारोप...इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी दक्षिण कोरियाच्या दूतांशी बोलताना स्पष्ट केले की, खाडी क्षेत्रातील अस्थिरतेसाठी केवळ अमेरिका आणि इस्रायल जबाबदार आहेत. त्यांनी याला 'वॉर क्राईम' संबोधले असून इराण केवळ आपल्या सागरी हितांचे रक्षण करत असल्याचे सांगितले.
Web Summary : Despite US claims, Iran maintains Hormuz control using fast boats and anti-ship missiles. Iran plans to control oil traffic, challenging US naval blockade. Iran blames US and Israel for regional instability, defending its maritime interests.
Web Summary : अमेरिकी दावों के बावजूद, ईरान तेज़ नौकाओं और एंटी-शिप मिसाइलों का उपयोग करके होर्मुज पर नियंत्रण बनाए रखता है। ईरान की योजना तेल यातायात को नियंत्रित करने की है, जो अमेरिकी नौसेना नाकाबंदी को चुनौती दे रही है। ईरान ने क्षेत्रीय अस्थिरता के लिए अमेरिका और इज़राइल को दोषी ठहराया, अपने समुद्री हितों की रक्षा कर रहा है।