By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 13:38 IST
1 / 9Mumbai CSMT Vande Bharat Train Time Table Changed: भारतीय रेल्वेची वंदे भारत ट्रेन लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. संपूर्ण देशात सुमारे १६० सेवा वंदे भारत ट्रेन सेवा देतात. यापैकी अनेक सेवा मुंबईतून धावतात. यातच आता मुंबईहून सुटणाऱ्या पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. ही ट्रेन मुंबई ते बंगळूरू या दरम्यान धावणार आहे. 2 / 9आताच्या घडीला मुंबई - मडगाव (गोवा) वंदे भारत एक्सप्रेस, मुंबई - साईनगर शिर्डी, मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस, मुंबई - जालना/नांदेड वंदे भारत एक्सप्रेस, मुंबई सेंट्रल - गांधीनगर कॅपिटल (गुजरात) वंदे भारत एक्सप्रेस, मुंबई - अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस या वंदे भारत ट्रेन मुंबईतून सुटतात. 3 / 9छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते हजूर साहिब नांदेड या दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. मुंबई-नांदेड वंदे भारत एक्सप्रेसचे हे सुधारित वेळापत्रक ३ मे २०२६ पासून लागू केले जाणार आहे. 4 / 9मुंबई ते नांदेड या मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचे नियोजन नव्याने करावे लागणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, ट्रेन क्रमांक २०७०६ CSMT-नांदेड वंदे भारत एक्सप्रेस आता CSMT वरून दुपारी १३:१० ऐवजी १३:१५ वाजता सुटेल. 5 / 9CSMT-नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन दादरला १३:२० वाजता, छत्रपती संभाजीनगरला १८:४३ वाजता, जालन्याला १९:३८ वाजता आणि परभणीला २१:२३ वाजता पोहोचेल. नांदेड येथे ही गाडी रात्री २२:२५ वाजता आपला प्रवास पूर्ण करेल. 6 / 9ठाणे, कल्याण, नाशिक रोड आणि मनमाड स्थानकांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक २०७०५ हजूर साहिब नांदेड-CSMT वंदे भारत एक्सप्रेस आता पहाटे ०५:०० ऐवजी ०५:२० वाजता नांदेडवरून सुटेल. 7 / 9नांदेड-CSMT वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन परभणीला ०५:५८, जालन्याला ०७:३३ आणि छत्रपती संभाजीनगरला ०८:२३ वाजता पोहोचेल. मुंबईतील CSMT स्थानकावर ही गाडी दुपारी १४:१५ वाजता पोहोचणार आहे. या मार्गावरील मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि दादर स्थानकांच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही.8 / 9तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणाऱ्या तीन ट्रेनच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. १२१४२ पाटलीपुत्र – LTT एक्सप्रेस: लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे दुपारी १४:२० वाजता पोहोचेल.9 / 9२२१८० MGR चेन्नई – LTT एक्सप्रेस: LTT येथे दुपारी १४:३० वाजता पोहोचेल. ११०१२ धुळे – CSMT एक्सप्रेस: CSMT येथे दुपारी १४:२५ वाजता पोहोचेल, असे म्हटले जाते आहे.