शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 12:43 IST

America Donald Trump News: अमेरिकेतील जन्मसिद्ध नागरिकत्वाचा मुद्दा गाजत असतानाच ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे असल्याचे म्हटले जात आहे.

America Donald Trump News: जोपर्यंत इथे नक्की काय चालले आहे, याची जाणीव झाली नाही, तोपर्यंत भारतीयांचा मी एक मोठा समर्थक होतो, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडिओचा संदर्भ दिला आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अमेरिकेच्या काही भागांमध्ये, विशेषतः कॅलिफोर्नियाच्या तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरभरती प्रक्रियेवर भारतीयांचे वर्चस्व आहे.

तुम्ही भारत किंवा चीनमधील असणे आवश्यक आहे; कारण येथील जवळपास सर्व अंतर्गत यंत्रणा भारतीय आणि चिनी लोकांद्वारेच चालवल्या जातील, अशा प्रकारे त्यांची उभारणी करण्यात आली आहे. नोकऱ्यांसाठी श्वेतवर्णीय उमेदवारांनी अर्ज करण्याची आवश्यकता नाही, अंतर्गत भरती प्रक्रिया भारतीय व चीन लोकांद्वारे चालवल्या जातात, असा आरोप करण्यात आला आहे. हे दावे कोणत्याही पुराव्याशिवाय मांडण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. तसेच ही बाब मला खात्रीशीरपणे माहिती आहे आणि यावर माझ्याशी कोणीही वाद घालण्याची काही गरज नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

भारत, चीन यांसारख्या 'नरकसदृश' अमेरिकेत येतात आणि...

स्थलांतरित लोक चीन, भारत किंवा या पृथ्वीवरील इतर कोणत्याही 'नरकसदृश' ठिकाणांहून अमेरिकेत येतात; इथे मुले जन्माला घालतात, जी अमेरिकेचे नागरिक होतात, त्यानंतर ते चीन किंवा भारतातून आपल्या संपूर्ण कुटुंबाला येथे बोलावून घेतात, असे म्हणत ट्रम्प यांनी 'जन्मसिद्ध नागरिकत्व' या मुद्द्यावर सुरू असलेल्या एका व्यापक चर्चेचा संदर्भ दिला. अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय आणि कायदेशीरदृष्ट्या चर्चेत आला आहे. सर्वोच्च न्यायालयात त्याच्या व्याप्तीवर सुनावणी सुरू आहो. या घटनांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही पोस्ट केली आहे. जन्मसिद्ध नागरिकत्वाबाबत येऊ घातलेल्या निकालाविषयी बोलताना ट्रम्प म्हणाले की, जर त्यांनी जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या मुद्द्यावर आपल्या देशाच्या विरोधात निकाल दिला आणि तसे होण्याचीच शक्यता अधिक आहे, तर अमेरिकेला प्रचंड आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल; परंतु, त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, अमेरिकेला आपली 'प्रतिष्ठा' गमवावी लागेल!

दरम्यान, या व्हिडिओमध्ये, विशेषतः भारतीय आणि भरती प्रक्रियेबाबतचे दावे, हे वादग्रस्त असून ते कोणत्याही सिद्ध पुराव्यांऐवजी केवळ राजकीय मतेच प्रतिबिंबित करतात, असे सांगितले जाते. अमेरिकेत आणि विशेषतः तंत्रज्ञान क्षेत्रात, भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने, या विधानांमुळे भारतात नक्कीच लक्ष वेधले जाण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's Remarks Compare India to Hell, Sparks Citizenship Debate

Web Summary : Donald Trump's comments linking India to 'hell-like' places and criticizing birthright citizenship have stirred controversy. He claimed Indians dominate US tech hiring, questioning the merit-based system and potentially impacting Indo-US relations amid ongoing legal debates.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारतIndiaभारतchinaचीन