Vaibhav Suryavanshi IPL 2026: भारतीय क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशी हे नाव सध्या गाजतंय. राजस्थान रॉयल्स संघाने गेल्या वर्षी त्याला आयपीएलसाठी त्यांच्या संघात घेतले. तेव्हापासून त्याने आपली छाप पाडली आहे. कनिष्ठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा आयपीएलसारखी स्पर्धा असो, वैभव आपल्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अवघ्या १५ वर्षांचा असूनही तो अनेक अनुभवी गोलंदाजांना पुरून उरला आहे. त्यामुळेच त्याची सर्वाधिक चर्चा आहे. पण असे असतानाच, त्याच्याबद्दलची एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे. सामना संपल्यानंतर बोलताना त्यानेच या गोष्टीबाबात खुलासा केला आहे.
वैभवला या गोष्टीशिवाय चैनच पडत नाही...
वैभवला अजूनही कार्टून बघायला खूप आवडते. स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत वैभव सूर्यवंशीने आपल्या कार्टून पाहण्याच्या सवयीबद्दल सांगितले. "ज्या वयात लहान मुलं कार्टून पाहतात, त्या वयात तू जगप्रसिद्ध गोलंदाजांची धुलाई करतोस. हे तुला कसे जमते? तुझ्या मनात काय सुरू असते?" असे प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर वैभव सूर्यवंशीचे उत्तर आश्चर्यकारक होते. तो म्हणाला, "माझ्या मनात काहीच सुरू नसते. मी शांत असतो. प्रत्येक सामन्यापूर्वी कार्टून बघतो. मला कार्टून पाहण्याची सवय आहे. मी आजही नियमित कार्टून बघतो. पण कार्टून बघत असतो तरीही मी सामन्याकडे आणि क्रिकेटकडे दुर्लक्ष करत नाही. माझे मुख्य लक्ष सामन्यावरच असते," असे वैभव सूर्यवंशीने सांगितले.
वैभव सूर्यवंशीचा धुमधडाका
वैभव सूर्यवंशीने गेल्या वर्षीच IPL मध्ये पदार्पण केले. गेल्या वर्षीच्या हंगामात त्याने ७ सामने खेळून २५२ धावा केल्या. त्यात एक दमदार शतकही समाविष्ट होते. यंदाच्या हंगामात आतापर्यंत वैभवने ७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने सर्वोत्तम ७८ धावांची खेळी केली आहे. त्याने आतापर्यंत २ अर्धशतकांसह एकूण २५४ धावा केल्या आहेत. त्याच्या खेळीत एकूण २६ चौकार आणि २० षटकारांचा समावेश आहे. वैभवच्या धडाकेबाज खेळीमुळे राजस्थानच्या संघालाही चांगली सलामी मिळत आहे. त्यामुळे त्यांची यंदाच्या हंगामातील कामगिरी उत्तम होत आहे.
Web Summary : Young cricket sensation Vaibhav Suryavanshi credits cartoons for his calm demeanor. Before each match, he indulges in watching cartoons, a ritual he believes helps him focus despite his age and pressure.
Web Summary : युवा क्रिकेट सनसनी वैभव सूर्यवंशी अपनी शांत मनोदशा का श्रेय कार्टून को देते हैं। प्रत्येक मैच से पहले, वह कार्टून देखते हैं, एक ऐसी रस्म जो उन्हें अपनी उम्र और दबाव के बावजूद ध्यान केंद्रित करने में मदद करती है।