शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 13:28 IST

२३४ मतदारसंघासाठी आज मतदान, राज्यभरात १,४०,००० हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात  

चेन्नई: २३४ मतदारसंघ असलेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार असून, ५.७३ कोटींहून अधिक मतदार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. या निवडणुकीत सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स (एसपीए) चा मुख्य पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चा मुख्य अद्रमुक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एकीकडे द्रमुक सत्ता टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे अद्रमुक विरोधी पक्षात पाच वर्षे राहिल्यानंतर पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

मुख्यमंत्री आणि द्रमुक अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी तामिळनाडूला दक्षिण आशियातील आदर्श राज्य बनवण्याचे आश्वासन दिले आहे.तामिळनाडू वेत्री कळघम (टीव्हीके) चे संस्थापक विजय हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. ते चेन्नईतील पेरांबूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व येथून निवडणूक लढवत आहेत. विजय यांनी पलानीस्वामींवर टीका करत विचारले की, माजी मुख्यमंत्री त्यांच्या सेलमव्यतिरिक्त इतर कोणत्याही मतदारसंघातून जिंकू शकतात का? 

मतदानाची जय्यत तयारी 

राज्यातील निवडणुकीचा प्रचार २१ एप्रिल रोजी संपला. राज्य विधानसभा निवडणुकीसाठी मतदान गुरुवार, २३ एप्रिल रोजी होणार आहे. निवडणुकीपूर्वी, तामिळनाडूच्या मुख्य निवडणूक अधिकारी अर्चना पटनायक यांनी मतदान सुरळीत पार पडावे यासाठी सुरू असलेल्या विविध तयारीचा आढावा घेण्यासाठी नियंत्रण कक्षाला भेट दिली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची मतदान केंद्रांपर्यंतची वाहतूक वेगाने केली. निवडणुकीदरम्यान सुरक्षा राखण्यासाठी राज्यभरात १,४०,००० हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत.

१,२६२ कोटीं रुपयांच्या वस्तू, ५४३ कोटी रोख जप्त; नोटांची अनेक बंडल जप्त

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने राज्यात वाहन तपासणी दरम्यान ५४३ कोटी रुपयांच्या रोख रकमेसह १,२६२ कोटी रुपयांच्या वस्तू जप्त केल्या आहेत. विविध उल्लंघनांसाठी १६३ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, तर सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलने विविध प्लॅटफॉर्मवरून २,१८० यूआरएल काढून टाकले आहेत. मईलापूर विधानसभा मतदारसंघातील द्रमुक उमेदवार डी. ए. वेलू यांच्या निकटवर्तीय सहकाऱ्याच्या घरावर भरारी पथकाने छापा टाकून ५०० रुपयांच्या नोटांचे अनेक बंडल जप्त केले आहेत. 

या जागांवर सर्वांची नजर

कोलाथूर (चेन्नई): मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन सलग चौथ्या विजयासाठी मैदानात आहेत. त्यांच्यासमोर अण्णाद्रमुक आणि टीव्हीकेने कडवे आव्हान उभे केले आहे.एडप्पाडी (सेलम): विरोधी पक्षनेते ई. पलानीस्वामी आपल्या बालेकिल्ल्यात लढत आहेत. विशेष म्हणजे, अभिनेता विजय यांनी येथे अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देऊन त्यांच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

पेरंबूर आणि तिरुचिरापल्ली 

पूर्व : सुपरस्टार विजय यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर या दोन जागांवरून नशीब आजमावत आहेत. त्यांच्या 'शिट्टी' चिन्हाची आणि तरुणांमधील क्रेझची मोठी चर्चा आहे.चेपॉक-तिरुवल्लिकेनी : उपमुख्यमंत्री उधयनिधी स्टॅलिन आपली जागा राखण्यासाठी मैदानात आहेत. त्यांच्या विजयावर त्यांची पक्षातील भावी प्रतिमा अवलंबून असेल.

विजयच्या टीव्हीके पक्षाविरोधात तक्रार

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय याच्या टीव्हीके पक्षाविरोधात बुधवारी निवडणूक आयोगाकडे औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. टीव्हीकेने मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन मोहीम राबवण्याची योजना आखली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tamil Nadu Elections: 5.73 Crore Voters to Decide Fate of Candidates

Web Summary : Tamil Nadu votes for its Assembly, with DMK and AIADMK vying for power. Key constituencies like Kolathur and Edappadi are in focus. Actor Vijay's TVK party debuts, adding excitement. Over ₹1262 crore seized during inspections.
टॅग्स :TamilnaduतामिळनाडूElectionनिवडणूक 2026