अनेकदा आपण कठोर परिश्रम करतो, पण नशिबाची साथ मिळत नाही किंवा घरात सतत नकारात्मकता जाणवते. वास्तू शास्त्रानुसार झोपताना उशीखाली काही विशिष्ट वस्तू ठेवल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या मानसिक आणि आर्थिक स्थितीवर होतो.
हे ही वाचा : गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
झोप ही आपल्या शरीराच्या आणि मनाच्या 'रीसेट' बटणासारखी असते. झोपताना आपल्या सभोवतालची ऊर्जा कशी आहे, याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि नशिबावर होतो. श्रद्धेने केलेले छोटे उपाय जीवनात मोठे बदल घडवू शकतात. यासाठी पुढील घरगुती वस्तूंचा वापर सुचवला आहे. तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे त्यानुसार दिलेल्या वस्तूंपैकी संबंधित वस्तु तुमच्या उशाशी ठेवा.
मिरी (Black Pepper): जर तुमचे काम होता होता थांबत असेल, तर उशीखाली मिरी ठेवावी. यामुळे भाग्य उजळते आणि अडकलेली कामे मार्गी लागतात.
हळकुंड (Turmeric Root): नात्यात वारंवार वाद होत असतील, तर हळकुंड ठेवावे. यामुळे गुरु ग्रहाचे बळ मिळते आणि नात्यात प्रेम व गोडवा वाढतो.
लवंग (Clove): नकारात्मक शक्ती किंवा रात्री वाईट स्वप्ने पडत असतील, तर २-३ लवंगा उशीखाली ठेवाव्यात. यामुळे वाईट नजर आणि वाईट विचारांपासून रक्षण होते.
वेलची (Cardamom): आर्थिक चणचण भासत असेल, तर हिरवी वेलची ठेवावी. यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो आणि धनप्राप्तीचे नवे मार्ग खुले होतात.
हे ही वाचा : Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
तुरटी (Alum): ज्यांना रात्री दचकून जाग येते किंवा भीती वाटते, त्यांनी उशीखाली लहानसा तुरटीचा तुकडा ठेवावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शांत झोप लागते.
बडीशेप (Fennel Seeds): जर तुम्हाला खूप मानसिक ताण (Stress) असेल किंवा डोक्यात विचारांचे चक्र सुरू असेल, तर एका कापडात बडीशेप बांधून उशीखाली ठेवा. यामुळे राहुचा दोष कमी होतो आणि मन शांत राहते.
मोरपंख (Peacock Feather): घरात सुख-शांती आणि समृद्धी हवी असेल, तर मोरपंख ठेवावा. हे सकारात्मकतेचे प्रतीक असून यामुळे एकाग्रता वाढते आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.
छोटेसे नाणे (Small Coin): करिअरमध्ये प्रगती किंवा नोकरीत संधी हवी असल्यास उशीखाली चांदीचे नाणे ठेवावे. यामुळे आर्थिक स्थिरता मिळते.
लसूण पाकळी (Garlic Clove): असे मानले जाते की लसणाची एक पाकळी उशीखाली ठेवल्याने सुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि निद्रानाशाची समस्या दूर होते.
हे ही वाचा : Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ
हे उपाय करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा:
१. या वस्तू थेट उशीखाली ठेवण्याऐवजी एका लहान पिवळ्या किंवा लाल सुती कापडात बांधून ठेवाव्यात.
२. या उपायांमध्ये श्रद्धा आणि सकारात्मकता असणे अत्यंत आवश्यक आहे.
३. उशीखाली कचरा, जुनी कागदपत्रे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू (मोबाईल इ.) ठेवणे टाळावे, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
Web Summary : वास्तु Shastra suggests placing specific items under your pillow for positivity and financial well-being. Black pepper, turmeric, cloves, cardamom, alum, fennel seeds, peacock feathers, coins, and garlic may improve luck, relationships, finances, sleep, and peace.
Web Summary : वास्तु शास्त्र के अनुसार, तकिये के नीचे कुछ खास चीजें रखने से सकारात्मकता और आर्थिक स्थिति बेहतर होती है। काली मिर्च, हल्दी, लौंग, इलायची, फिटकरी, सौंफ, मोर पंख, सिक्के और लहसुन भाग्य, रिश्ते, वित्त, नींद और शांति में सुधार कर सकते हैं।