Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 13:44 IST2026-04-21T13:43:08+5:302026-04-21T13:44:05+5:30
Narasimha Navaratri 2026: यंदा २२ ते ३० एप्रिल नृसिंह नवरात्र असणार आहे, या नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे, या नऊ दिवसात केलेली उपासना नऊ पट जास्त पुण्य देते, अशी श्रद्धा आहे.

Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ
भारतीय संस्कृतीत नवरात्र केवळ शक्तीच्या (देवीच्या) उपासनेसाठी नसून, ते भगवान विष्णूंच्या उग्र अवताराच्या उपासनेसाठी देखील महत्त्वाचे आहे. २२ एप्रिल रोजी नृसिंह नवरात्र(Narasimha Navratri 2026) सुरू होत असून, या ९ दिवसांच्या काळात केलेली उपासना मनुष्याला निर्भय बनवते आणि जीवनातील अडथळे दूर करते. ३० एप्रिल रोजी नृसिंह जयंतीला(Narasimha Jayanti 2026) अर्थात वैशाख शुक्ल चतुर्दशीला हे नवरात्र संपून या उत्सवाची सांगता होईल. या कालावधीत भक्तांनी पुढील उपाय केले असता त्यांना अनेक प्रकारचे लाभ होतात. त्याबद्दल जाणून घेऊ.
हे ही वाचा : Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?
१. उत्सवाचे महत्त्व (Significance)
भगवान विष्णूंनी आपल्या लाडक्या भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी आणि हिरण्यकश्यपूच्या विनाशासाठी 'नृसिंह' अवतार घेतला. हा अवतार अर्धा मानवी आणि अर्धा सिंहाचा आहे.
विजय: हा उत्सव 'सत्याचा असत्यावर' आणि 'न्यायाचा अन्यायावर' झालेला विजय दर्शवतो.
संरक्षण: ज्याप्रमाणे प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी देव खांबातून प्रकट झाले, तसेच आपल्या संकटकाळी देव पाठीशी उभा राहतो, हा विश्वास या नवरात्रातून मिळतो.
ग्रहांची शांती: विशेषतः शनी आणि मंगळ ग्रहांच्या दोषांवर नृसिंह उपासना अत्यंत प्रभावी मानली जाते.
हे ही वाचा : Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
२. पूजा विधी (Puja Vidhi)
नृसिंह नवरात्रात रोज सकाळी आणि संध्याकाळी खालीलप्रमाणे पूजा करावी:
संकल्प: पूजेच्या पहिल्या दिवशी हातामध्ये अक्षता आणि पाणी घेऊन नृसिंह नवरात्र व्रत करण्याचा संकल्प करावा.
प्रतिष्ठापना: घराच्या देव्हाऱ्यात किंवा ईशान्य कोपऱ्यात नृसिंह देवाचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. जर मूर्ती नसेल तर भगवान विष्णूंच्या फोटोची पूजा करावी. तोही नसेल तर देवघरातील बाळकृष्णाची पूजा करावी.
अभिषेक: शक्य असल्यास मूर्तीला पंचामृताने आणि शुद्ध पाण्याने अभिषेक करावा.
अर्पण: देवाला लाल फुले, पिवळे वस्त्र आणि तुळशीपत्र अर्पण करावे.
नैवेद्य: नृसिंह देवाला गूळ, चण्याची डाळ किंवा 'पनकम' ( केशरयुक्त गुळाचे पाणी) आणि दही-भाताचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे.
मंत्र जप: या ९ दिवसात "ॐ नृसिंहाय विद्महे, वज्रनखाय धीमही, तन्नो नृसिंह: प्रचोदयात" या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
हे ही वाचा : Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
३. या ९ दिवसात काय करावे?
१. नृसिंह कवच पठण: शत्रूंपासून संरक्षण आणि आरोग्यासाठी 'नृसिंह कवच' वाचणे अत्यंत फलदायी ठरते.
२. सात्त्विक आहार: शक्य असल्यास या ९ दिवसांत उपवास करावा किंवा सात्त्विक आहार घ्यावा.
३. दानधर्म: गरिबांना अन्नदान करणे आणि तहानलेल्यांना पाणी देणे याला नृसिंह उपासनेत मोठे महत्त्व आहे.
४. क्षमा याचना: नवरात्राच्या शेवटच्या दिवशी आपल्या हातून झालेल्या चुकांची क्षमा मागून आरती करावी.
कलियुगात जो भक्तियुक्त अंतःकरणाने श्रीनृसिंहाचे पूजन करेल त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतील तर त्याच्या सर्व शत्रूंचा नाश होऊन तो मोक्षाचा अधिकारी होतो असे म्हटले जाते.