शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 12:26 IST

कामाच्या ठिकाणी निर्माण होणारं वातावरण लोकांमध्ये हृदयविकार, स्ट्रोक आणि मानसिक आजारांचा धोका वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात असं वैज्ञानिक अभ्यासांमधून मिळालेल्या डेटातून स्पष्ट दिसते.

राहणीमान सुधारणे, कुटुंबाला आधार देणे आणि आत्मनिर्भरता जपणे यासाठी नोकरी पर्याय असते. याच पर्यायासाठी बहुतांश लोक अनेक शहरांतून कन्फर्ट सोडून दुसऱ्या शहरांकडे वळतात. परंतु तीच नोकरी, टॉक्सिक वर्क कल्चर जेव्हा जीवघेणी ठरते तेव्हा चिंता वाढते. GENEVA जागतिक कामगार संघटनेकडून समोर आलेले नवीन आकडे धक्कादायक आहेत. दरवर्षी ८ लाख ४० हजाराहून अधिक लोक टॉक्सिक वर्क कल्चरमुळे मृत्यूमुखी पडत असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. 

हे मनोसामाजिक धोके येतात तरी कुठून?

लोकांना कामाशी निगडित चिंता, अधिक वेळ कामाला वेळ देणे, नोकरी जाण्याची चिंता सतावणे या सर्व गोष्टींमुळे साइकोसोशल रिस्क जन्माला येते. त्यामुळेच लोक हार्ट आणि ब्रेनशी निगडित समस्यांचा सामना करत आहेत. काही प्रकरणात मानसिक दबावामुळे कर्मचारी टोकाचे पाऊल उचलत आहेत. या आजारामुळे अकाली मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या समोर येते, ज्यामुळे दरवर्षी जागतिक जीडीपीच्या १.३७ टक्के इतके अंदाजित आर्थिक नुकसान होते.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास हा रिपोर्ट कामाच्या ठिकाणी असलेल्या मानसिक वातावरणाचे परीक्षण करतो. सर्वात पहिले कर्मचाऱ्यांना त्यांची उद्दिष्ट्ये साध्य करण्यास मदत व्हावी यासाठी कामाचे वातावरण कसे तयार केले जाते आणि त्याचे व्यवस्थापन कसे केले जाते हे पाहिले जाते. दुसरा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्यालयाचे वातावरण, सहकारी, वरिष्ठ आणि व्यवस्थापनासोबतचे संबंध आणि संवाद, कारण हे घटक देखील मानसिक आजारास कारणीभूत ठरतात. तिसरं म्हणजे कार्यालयाची धोरणे आणि नियम, जसे की कामासाठी, घरून काम करण्यासाठी आणि वैयक्तिक कामासाठी वेळेवर मिळणारी रजा, आणि आरोग्याशी संबंधित लाभ यांच्याशी निगडित आहेत. 

दरम्यान, कामाच्या ठिकाणी निर्माण होणारं वातावरण लोकांमध्ये हृदयविकार, स्ट्रोक आणि मानसिक आजारांचा धोका वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात असं वैज्ञानिक अभ्यासांमधून मिळालेल्या डेटातून स्पष्ट दिसते. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि 'ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज' (GBD) अभ्यासाकडील जागतिक मृत्यूदर आणि आरोग्यविषयक डेटाला हे धोके लागू करून आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) हा डेटा प्रसिद्ध केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Toxic work culture causes over 8 lakh deaths annually: Report

Web Summary : Toxic work environments, driven by job insecurity and excessive workloads, cause over 8.4 lakh deaths yearly. This leads to heart issues, mental health problems, and significant economic losses globally. Addressing workplace culture is crucial for employee well-being and productivity.
टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटना