शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

Sanjay Raut: महाराष्ट्रातील विरोधकांसाठी आपलं 'ठोकरे' सरकार; १०५ आमदार असणाऱ्यांनी सांभाळून राहावं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 8:17 PM

राऊत यांनी शिवसैनिकांची फळी मजबूत करण्याबरोबरच शिवसेना पक्ष, उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अशा विविध विषयांवर भाष्य केले

ठळक मुद्देपुणे महापालिकेवर भगवा फडकवण्याची वेळ आली आहे

पुणे : महानगरपालिका निवडणूक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पक्षांचे राजकीय नेते महाराष्ट्रातील जिल्हयातून कार्यकर्त्यांच्या भेटीबरोबरच महापालिकांचा आढावा घेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी शिवसैनिकांची फळी मजबूत करण्याबरोबरच शिवसेना पक्ष, उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अशा विविध विषयांवर भाष्य केले. तर विरोधकांवर टोलेबाजी करत टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेची काय ताकद आहे या विषयावर बोलताना राऊत म्हणाले, शिवसेना हा रेसचा घोडा आहे. घोडे लावायचे त्यांना लावले आहेत. घोडे लावण्यात मी माहीर आहे. ते मला सांगव लागत नाही. हे महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आहे. पण अशा लोकांसाठी ठोकरे सरकार आहे. ठोकून काढणं आपलं काम आहे. त्यामुळं १०५ आमदार असणाऱ्यांनी सांभाळून राहावं अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.'' 

शिवसेना आग आहे, वाट्याला जाऊ नका 

''राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. सर्वांनी त्यांच्याकडं त्याच आदरानं पाहावं अशी त्यांचीही नक्कीच अपेक्षा असेल. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यास अटक झाली ना. अशी टीकाही त्यांनी नारायण राणेंवर केली आहे. त्यामुळं शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका, शिवसेना आग असल्याचा इशारा राऊत यांनी यावेळी दिलाय. शिवसेना महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला पाहिजे. ते सर्वांना घेऊन काम करत आहेत. असंही ते म्हणाले आहेत.'' मी पुन्हा येईन वाक्यावर राऊतांच्या खोचक टोला 

''पुणेकरांचा उत्साह खूप असतो. त्यांना काही सांगावं लागत नाही. आता पुणे महापालिकेत १० नगरसेवक आहेत. पण यावेळी हीच संख्या वाढायला हवी. असं म्हणत पुणे महापालिकेवर भगवा फडकवण्याची वेळ आली आहे. अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. शाखा ही शिवसेनेची ताकद आहे. लहान लहान कार्यकर्त्याशी बोलत राहील पाहिजे. पुण्यातील वातावरण चांगलं आहे. 'मी पुन्हा येईन' म्हणत त्या अर्थाने नाही पक्षाच्या कामाने म्हणत फडणवीसांच्या वाक्यावर राऊत यांनी खोचक टोला लागलेला आहे.'' 

''पुणे, पिंपरी - चिंचवड महापालिकांमध्ये भगवा फडकत नाही, याची खंत वाटते. शिवसेनेचे खासदार - आमदार निवडून येतात, पण महापालिका निवडणुकीत फुगा फुटतो. मागील निवडणुकीत चारच्या पॅनेल होते म्हणून पराभव झाला असे म्हणणे योग्य नाही. आपला पाया ढेपाळला होता, संघटनात्मक बांधणी कमकुवत होती, हे मान्य करायला हवे. मागील निवडणुकीत झालेल्या चुका यंदा होता कामा नये. महाविकास आघाडी होईल का नाही, झाली तर काय, नाही झाली तर काय, या भानगडीत पडू नका. निवडणुका एकट्याच्या जीवावर लढायची सवय आपल्याला आहे. सगळया जागांवर स्वबळावर लढायची आपली तयारी आहे. मात्र, स्वाभिमान सोडून, भगव्या झेंड्याशी तडजोड करुन आघाडी होणार नाही. आलात तर तुमच्या सोबत, नाही तर तुमच्याशिवाय, असे शिवसेनेचे धोरण असल्याचं राऊत यांनी सांगितलं आहे.'' 

टॅग्स :PuneपुणेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे