हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवरील सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्सच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. घरच्या मैदानात अभिषेक शर्मा आणि ट्रॅविस हेड जोडीनं संघाल दमदार सुरुवात करून देताना फक्त २० चेंडूत संघाच्या धावफलकावर ५० धावा लावल्या. आयपीएलच्या इतिहासात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने तिसरे सर्वात जलद अर्धशतक झळकावले. लॉकी फर्ग्युसन याने अभिषेक शर्मा तर युझवेंद्र चहलनं ट्रॅविस हेडच्या खेळीला ब्रेक लावत संघाला मोठा दिलासा दिला. पण त्यानंतर पंजाबच्या संघातील खेळाडूंनी तीन सोपे झेल सोडले त्याचा हैदराबादच्या फलंदाजांनी फायदा उचलला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शशांक सिंगने सोपा झेल सोडला, चहलनं डोक्यालाच हात लावला
सनरायझर्स हैदराबादच्या डावातील नवव्या षटकात चहल गोलंदाजीला आला. या षटकातील चौथ्या चेंडूवर क्लासेन याने स्वीप शॉट खेळला. चेंडू थेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या शशांक सिंगच्या हातात गेला. पण त्याने सोपा झेल सोडला. ते पाहून चहलनं डोक्यालाच हात लावला. रिकी पाँटिंगही हताश होऊन त्याच्याकडे बघत राहिला. झेल सुटला त्यावेळी क्लासेन फक्त १३ धावांवर खेळत होता. जीवनदान मिळाल्यावर त्याने अर्धशतकी खेळी करत पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली.
हार्दिक पांड्या ते शिवम दुबे! IPL 2026 मध्ये ५ स्टार खेळाडूंचा अर्धशतकी रकाना रिकामाच
ईशान किशनला दोन जीवनदान
हेन्री क्लासेनच्या झेलशिवाय या सामन्यात पंजाबच्या कूपर कॉलॉनी आणि लॉकी फर्ग्युसन याने ईशान किशनला दोन वेळा जीवनदान दिले. याचा फायदा उठवत त्यानेही अर्धशतकी खेळी केली. सातव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर कूपर कॉलॉनी याने ईशानचा झेल सोडला. त्यानंतर चहलच्या घेऊन आलेल्या ११ व्या षटकात लॉकी फर्ग्युसने ईशानला आणखी एक संधी दिली.
Web Summary : Punjab's dropped catches, especially Shashank Singh's, proved costly against Hyderabad. Klassen and Kishan capitalized on these reprieves, smashing half-centuries. Chahal and Ponting visibly frustrated by the fielding errors.
Web Summary : पंजाब ने हैदराबाद के खिलाफ आसान कैच छोड़े, जिसका खामियाजा भुगतना पड़ा। क्लासेन और किशन ने जीवनदान का फायदा उठाकर अर्धशतक जड़े। चहल और पोंटिंग फील्डिंग से निराश दिखे।