Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 21:13 IST

याशिवाय, मे महिन्याच्या मध्यापर्यंत 'नयारा' ऑपरेशन्स सुरू करेल. यानंतर, रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या क्रूड युनिटच्या देखभालीसाठी तीन ते चार आठवडे कामकाज बंद ठेवणार आहे, असेही सुजाता शर्मा यांनी यावेळी सांगितले.

अमेरिका-इराण संघर्षामुळे संपूर्ण जगालाच इंधन संकटाचा सामना करावा लागत आहे. यातच भारतातील सर्वसामान्य जनतेसाठी पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजीच्या किमतींसंदर्भात एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यात कोणतीही वाढ केली जाणार नाही. केवळ व्यावसायिक (Commercial) एलपीजीच्या दरातच वाढ करण्यात आली आहे, असे सहसचिव सुजाता शर्मा यांनी एका आंतरमंत्रालयीन बैठकीत स्पष्ट केले आहे. 

याशिवाय, मे महिन्याच्या मध्यापर्यंत 'नयारा' ऑपरेशन्स सुरू करेल. यानंतर, रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या क्रूड युनिटच्या देखभालीसाठी तीन ते चार आठवडे कामकाज बंद ठेवणार आहे, असेही सुजाता शर्मा यांनी यावेळी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करता, गेल्या ३० एप्रिलला ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल १२६ डॉलर्सपर्यंत पोहोचल्या होत्या. अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली ही उच्चांकी पातळी होती. 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधील तणावामुळे तेल टँकरच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. महत्वाचे म्हणजे, हा इतिहासातील सर्वात मोठा पुरवठा अडथळा असल्याचे आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (IEA) म्हटले आहे. खरेतर यामुळे संपूर्ण जगालाच उर्जा अथवा इंधन संकटाचा सामना करावा लागला आहे.

दरम्यान, बुधवारी ब्रेंट क्रूडच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. कच्च्या तेलाचे दर ९ टक्क्यांनी घसरून ९९.७९ डॉलर्स प्रति बॅरलवर आले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये लवकरच शांतता करार होऊ शकतो, अशा आशयाच्या 'Axios'च्या अहवालानंतर ही सुधारणा दिसून आली आहे. युद्ध संपवणे आणि अणुचर्चेसाठी आराखडा तयार करणे या उद्देशाने व्हाईट हाऊस इराणसोबतच्या कराराला अंतिम रूप देण्याचे संकेत देत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या जागतिक घडामोडींमुळे इंधन दरवाढीचे संकट सध्या तरी टळल्याचे दिसत आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Good News: Petrol, Diesel, Gas Prices Stable Despite Global Crisis

Web Summary : Amidst global fuel concerns due to US-Iran tensions, India keeps petrol, diesel, and domestic LPG prices unchanged. Only commercial LPG rates increased. Brent crude prices fell, hinting at potential US-Iran peace talks.
टॅग्स :पेट्रोलडिझेलखनिज तेल