Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यागचं कारण

 सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या संघातील खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.

By सुशांत जाधव | Updated: May 6, 2026 20:09 IST

Open in App

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्सचा संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबचा संघ हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वलस्थान आणखी भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असेल. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादचा संघ नंबर वन होण्यासाठी जोर लावेल.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

 काळी पट्टी बांधून मैदानात उतरले पंजाब किंग्सचे खेळाडू, कारण...

 सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या संघातील खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. पंजाबचे माजी क्रिकेटपटू आणि वरिष्ठ निवड समितीचे माजी सदस्य अमनप्रीत गिल (Amanpreet Singh Gill) यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंजाब किंग्सच्या संघातील खेळाडू ब्लॅक आर्मबँडसह बांधून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.

दिवंगत क्रिकेटरनं IPL मध्ये पंजाबच्या संघाचेही केलं होतं प्रतिनिधीत्व

पंजाब क्रिकेट असोसिएशनने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून अमनप्रीत गिल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी भारत अंडर-१९ सह किंग्स इलेव्हन पंजाबचे नेतृत्व केल्याचा उल्लेखही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. २००९ मध्ये या माजी क्रिकेटरला किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाने करारबद्ध खेले होते. २०१० मध्ये या माजी क्रिकेटरनं युवराज सिंग, महेला जयवर्धने आणि ब्रेटली यासारख्या स्टार क्रिकेटर्ससोबत ड्रेसिंग रुम शेअर केली होती.

 

English
हिंदी सारांश
Web Title : SRH vs PBKS: Punjab Kings wear black armbands to honor deceased player.

Web Summary : Punjab Kings players wore black armbands against Hyderabad to mourn Amanpreet Gill's death. The former Punjab cricketer represented Kings XI Punjab in the IPL. Punjab seeks to strengthen its position in the points table.