पश्चिम बंगालमधील जोरदार विजयानंतर ९ मे रोजी भाजप सरकारचा शपथविधी समारंभ पार पडणार आहे. मात्र, राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा नेमकी कुणाच्या कांद्यावर असणार, यासंदर्भात अद्यापही सस्पेन्स कायम आहे. यातच, भाजप महिला मुख्यमंत्री बनवू शकतो, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांचा सलग दोन वेळ पराभव करणारे शुभेंदू अधिकारी हे या पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. भाजपने अद्याप अधिकृत नावाची घोषणा केलेली नाही.
या महिला उमेदवारांची जोरदार चर्चा -
महिलांचा विचरा करता, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अग्निमित्रा पॉल यांचे नाव आघाडीवर आहे. आसनसोल दक्षिणमधून त्यांनी तब्बल ४०८३९ मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. अग्निमित्रा या पेशाने प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहेत. त्या २०२१ मध्ये पहिल्यांदाच निवडणूक जिंकल्या होत्या. यानंतर त्या बंगाल भाजपच्या उपाध्यक्षही झाल्या.
दुसरे नाव आहे, 'महाभारत' मालिकेतून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या रूपा गांगुली यांचे. रुपा गांगुली यांच्या नावाचीही मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार चर्चा सुरू आहे. त्या सोनारपूर दक्षिणमधून ३५ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, गांगुली या २०१६ ते २०२२ दरम्यान राज्यसभा खासदारही होत्या.
बैठकांचे सत्र सुरू -
खरेतर पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण देशाचेच लक्ष्य लागले आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्या उपस्थितीत बैठक होईल आणि पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरेल. भवानीपूर आणि नंदीग्राममध्ये विजय मिळवणारे शुभेंदू अधिकारी यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय, बंगाल प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य, दिलीप घोष आणि आरएसएसचा मोठा चेहरा उत्पल महाराज यांची नावेही शर्यतीत आहेत.
महत्वाचे म्हणजे, विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडणुकीसाठी अमित शाह यांची मंगळवारी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी हे सह-निरीक्षक असणार आहे.
Web Summary : Following a decisive victory in West Bengal, BJP's swearing-in is on May 9th. Speculation suggests a woman CM, with Agnimitra Paul and Roopa Ganguly discussed. Shubhendu Adhikari remains a strong contender, decisions pending meetings with central leadership.
Web Summary : पश्चिम बंगाल में निर्णायक जीत के बाद, भाजपा का शपथ ग्रहण 9 मई को है। अटकलें हैं कि एक महिला मुख्यमंत्री हो सकती है, जिसमें अग्निमित्रा पॉल और रूपा गांगुली पर चर्चा की जा रही है। शुभेंदु अधिकारी एक मजबूत दावेदार बने हुए हैं, केंद्रीय नेतृत्व के साथ बैठकों का निर्णय लंबित है।