तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांने संपूर्ण देशाला चकित केले आहे, मात्र यात सर्वाधिक चर्चा होतेय ती तिरुपत्तूर विधानसभा मतदारसंघाची. येथे अभिनेता विजयच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाचे उमेदवार सीनिवसा सेतुपती आर. यांनी चक्क 'एका' मताच्या फरकाने विजय मिळवत इतिहास रचला. त्यांनी डीएमकेचे दिग्गज नेते तथा माजी मंत्री के. आर. पेरियाकरुप्पन यांचा पराभव केला. या निवडणुकीत सेतुपती यांना ८३,३७५ मते, तर पेरियाकरुप्पन यांना ८३,३७४ मते मिळाली आहेत.
काय म्हणाले आनंद महिंद्रा ?
या एकामताने झालेल्या विजयाची चर्चा संपूर्ण देशभरात सुरू आहे. यातच प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही या विजयाची दखल घेतली आहे. यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत ते म्हटले, "१६६००० पेक्षा जास्त मतदान झालेल्या मतदारसंघात केवळ एका मताने इतिहास बदलला, ही गोष्ट थक्क करणारी आहे. हे चित्र जगातील प्रत्येक शाळेत दाखवायला हवे. म्हणजे, भविष्यातील पिढ्यांना एका मताची ताकद समजेल." खरेतर, एका मताने मिळालेला हा विजय लोकशाहीतील प्रत्येक मताचे महत्त्व दर्शवणारा ठरला आहे.
विजय यांचा सत्तास्थापनेचा दावा -
या निवडणुकीत विजय यांच्या TVK पक्षाने १०८ जागांवर विजय मिळवला आहे. या यशानंतर विजय यांनी बुधवारी (६ मे २०२६) राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना भेटून अधिकृतपणे सरकार स्थापनेचा दावा केला. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे ज्येष्ठ नेते 'बुस्सी' आनंद, के. ए. सेंगोट्टैयन आणि आधव अर्जुन आदी उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे, तामिळनाडून सत्ता स्थापनेसाठी ११८ जागांची आवश्यकता आहे. मात्र टीव्हीकेकडे केवळ १०८ जागाच आहेत.
Web Summary : Tamil Nadu's Tirupattur saw TVK win by one vote, defeating a DMK heavyweight. Anand Mahindra highlighted the power of a single vote after Vijay's party claimed victory and seeks to form a government after winning 108 seats.
Web Summary : तमिलनाडु के तिरुपत्तूर में TVK एक वोट से जीता, DMK के दिग्गज नेता पराजित। आनंद महिंद्रा ने एक वोट की शक्ति पर प्रकाश डाला। विजय की पार्टी ने 108 सीटें जीतकर सरकार बनाने का दावा किया।