शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 23:03 IST

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व जण यमुना नदी ओलांडून दुसऱ्या बाजूला खरबूज खाण्यासाठी गेले होते. मात्र, परतताना त्यांच्यावर काळाने झडप घातली.

 
उत्तर प्रदेश हमीरपूरमध्ये यमुना नदीत नाव उलटल्याची घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत नऊ जण नदीत बुडाले असून, त्यांपैकी तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, अद्यापही सहा जण बेपत्ता असल्याचे समजते. त्यांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व जण यमुना नदी ओलांडून दुसऱ्या बाजूला खरबूज खाण्यासाठी गेले होते. मात्र, परतताना त्यांच्यावर काळाने झडप घातली.

फोनवर बोलत होता नाविक -
ही घटना कुरारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोतुपूर पटिया गावात घडली. श्रीपाल यांच्या मुलीचे मंगळवारी लग्न होते. बुधवारी मुलीच्या पाठवणीनंतर काही पाहुणे अथवा नातलग आनंदाच्या भरात नदीपलीकडे खरबूज खाण्यासाठी गेले होते. सायंकाळच्या वेळी सर्व कार्यक्रम अटोपून परत असताना, नावाडी विष्णू याच्या मोबाईलवर फोन आला आणि ते बोलू लागले. याचवेळी नाविकाचे नावेवरील नियंत्रण सुटल्याने आणि लहान मुलांसह नऊ जण यमुनेच्या पात्रात बुडाले.

एनडीआरएफ घटनास्थळी शोध सुरू -
अपघातानंतर नावाडी विष्णू पोहून बाहेर आला, तर पारुल (१४) आणि रिंकू या दोन मुलींना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. या दोघींनाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय, उर्वरित दोन सख्या भावांसह सहा जण अद्यापही बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच एसडीएम अभिषेक कुमार, सीओ राजेश कमल आणि पोलीस दलाने घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले आहे.

याशिवाय, एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Boat capsizes after send-off ceremony; 9 drown in Yamuna.

Web Summary : Nine drowned in Uttar Pradesh's Yamuna River after a boat capsized. Three were rescued, but six remain missing. The incident occurred when villagers were returning after eating watermelons. The boatman was on a call when the accident happened.
टॅग्स :riverनदीdrowningपाण्यात बुडणेPoliceपोलिस