Join us
Daily Top 2Weekly Top 5

SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने फलंदाजीनंतर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये सर्वोत्तम कामगिरी करून दाखवत 'नंबर वन'चा डाव साधला

By सुशांत जाधव | Updated: May 6, 2026 23:41 IST

Open in App

Sunrisers Hyderabad vs Punjab Kings, 49th Match Result : सनरायझर्स हैदराबादने घरच्या मैदानात पंजाब किंग्सचा ३३ धावांनी पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र पंजाबच्या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत सनरायझर्स हैदराबादने निर्धारित २० षटकांत ४ विकेट्स गमावत २३५ धावा केल्या. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना कूपर कॉलॉनी याने नाबाद शतकी खेळी केली, पण त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. अखेरीस पंजाब किंग्सला पराभव पत्करावा लागला.

'त्या' तीन चुका पंजाब किंग्सला चांगल्याच महागात पडल्या  

नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि ट्रॅविस हेड जोडीनं संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. अभिषेक शर्मा १३ चेंडूत ३५ धावा आणि ट्रॅवेस हेड १९ चेंडूत ३८ धावा करून परतल्यावर  लॉकी फर्ग्युसन आणि युझवेंद्र चहलनं यांनी  ईशान किशन आणि क्लासेन यांना स्वस्तात माघारी धाडण्यासाठी जाळे विणले. पण क्षेत्ररक्षणांनी गोलंदाजांना साथ दिली नाही. दोघांचे तीन झेल सुटले. याचा फायदा उठवत त्यांनी अर्धशतके झळकावत संघाच्या धावफलकावर मोठी धावसंख्या लावली. तीन चुकांची किंमत पंजाब किंग्सला पराभवासह मोजावी लागली. 

English
हिंदी सारांश
Web Title : SRH Dominates PBKS: Hyderabad's Victory Due to Punjab's Fielding Lapses

Web Summary : Sunrisers Hyderabad defeated Punjab Kings by 33 runs, securing the top spot in the points table. Punjab's poor fielding helped Hyderabad reach a formidable 235/4. Despite a century by Cooper Colony, Punjab fell short, succumbing to Hyderabad's dominant performance.
टॅग्स :आयपीएल २०२६सनरायझर्स हैदराबादपंजाब किंग्सश्रेयस अय्यरइशान किशन