शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ढोल-ताशांच्या गजरात ऊसतोड कामगार विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 15:28 IST

राज्यात दोनशे साखर कारखाने; पंधरा जिल्ह्यांतून जवळपास दहा लाख कामगारांचे स्थलांतर..

ठळक मुद्देऊसतोडणी मजुरांच्या मुलांचे वाजत-गाजत स्वागतबारामती, पुरंदर, खंडाळा आणि फलटण या तालुक्यांतील सर्वेक्षणात ६ ते १४ वयांची ६०९ मुले ९४ मुले जिल्हा परिषद, सोमेश्वर आणि सोमेश्वर विद्यालय या ठिकाणी दाखल

सोमेश्वरनगर : सजावट केलेल्या बैलगाडीतून शाळेमध्ये ढोल-ताशांच्या गजरात ऊसतोड कामगार मुलांचा  शालेय साहित्य देऊन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या हस्ते सोमेश्वर कारखाना तळावरील ९४ मुलांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम सोमेश्वर विद्यालय येथे आज पार पडला. बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण विभाग, टाटा ट्रस्ट मुंबई आणि जनसेवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून अशा प्रकल्पाच्या माध्यमातून सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बारामती, पुरंदर, खंडाळा आणि फलटण या तालुक्यांतील केलेल्या सर्वेक्षणात ६ ते १४ वयांची ६०९ मुले आढळली आहेत. यातील सोमेश्वर कारखाना तळावरील ९४ मुलांना जिल्हा परिषद, सोमेश्वर आणि सोमेश्वर विद्यालय या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम पार पडला. दरम्यान ‘आशा’ या इंग्रजी भाषेचे आणि ‘शिक्षणकोंडी’ या मराठी भाषेच्या अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी विद्या परिषदेच्या उपसंचालिका शोभा खंदारे, शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्राथमिक शिक्षणधिकारी राजेश क्षीरसागर, सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश रासकर, संचालक लक्ष्मण गोफणे, डायटचे प्राचार्य रामचंद्र कोरडे, डायट प्राचार्या कमलादेवी आवटे, गटशिक्षणधिकारी संजय जाधव, गटशिक्षणधिकारी गजानन आडे, सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे उपस्थित होते. प्रकल्पप्रमुख संतोष शेंडकर यांनी सूत्रसंचालन, तर  प्रास्ताविक परेश ज. म यांनी केले. .....राज्यात दोनशे साखर कारखाने आहेत. पंधरा जिल्ह्यांतून जवळपास दहा लाख कामगारांचे स्थलांतर होते असते. यांच्यासोबत एक लाख शाळांतील मुले स्थलांतरित होत असतात. यांचे शिक्षण, तसेच आरोग्य, सुरक्षा हे पण प्रश्न आहेत. हे स्थलांतर कसे रोखता येईल आणि सहा महिने सुविधा कशा मिळतील? यासाठी काम करणार असून, पुढील काळात स्थलांतर होणार नाही यासाठी उपाययोजना करू.- विशाल सोळंकी,  शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र ......

टॅग्स :BaramatiबारामतीSugar factoryसाखर कारखानेSchoolशाळाStudentविद्यार्थी