शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar:'मेळाव्यात काहींची भाषणं नको इतकी लांबली, कुणाची लांबली ते...' अजित पवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 09:35 IST

भाषणानंतर बारकाईने विचार करून महाराष्ट्रातल्या जनतेने, मतदारांनी आणि विशेषता शिवसैनिकांनी निर्णय घ्यावा

बारामती : मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात काहींची भाषणं फारचं लाबंली. नको इतकी लांबली. आता कुणाची लांबली ते तुम्हीच विचार करा, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाला टोला लगावला. विरोधी पक्षनेते बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बारामती पत्रकारांशी संवाद साधला.

 पवार पुढे म्हणाले,  दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकायला मुंबईत यायचे, ही परंपरा आहे. पण दसरा मेळाव्यासाठी १० कोटी रुपये खर्च करून मेळाव्याला गर्दी जमा केली. यासाठी एसटी बससेचा उपयोग केला गेला. मात्र, अनेक एसटी बस दसरा मेळाव्यासाठी गेल्याने सर्वसामान्य प्रवाशांची अडचण झाली. त्यांच्यासाठी एसटी आहे. आणि कशा प्रकारे वापर झाला हे दिसल असल्याची टीका केली.

आता मतदारांनी विचार करावा  मी दोघांची भाषणं ऐकली. पहिलं उद्धव ठाकरेंचं झालं आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंचं झालं. दोघांनी काय भाषणं केली हे सर्वांनी पाहिलं. यावर आम्ही जास्त टीका-टीपणी करण्याची गरज नाही. आता याबद्दल बारकाईने विचार करून महाराष्ट्रातल्या जनतेने, मतदारांनी आणि विशेषता शिवसैनिकांनी निर्णय घ्यायचा आहे. पुढे काय केलं पाहिजे,  भूमिका काय असली पाहिजे, कुणाच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे, कुणाची शिवसेना मूळ शिवसेना आहे, याचा विचार त्यांनी करावा असेही पवार यावेळी म्हणाले. 

 हा प्रकल्प गेल्याने दोन लाख तरुणांचा रोजगार गेला

वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारच्या कमीपणामुळे गेला. राज्यात जे सरकार आहे, त्याच विचाराचं सरकार केंद्रातही आहे. पण हा प्रकल्प गेल्याने दोन लाख तरुणांचा रोजगार गेला आहे. यातून तरुणांचा रोष हा आपल्यावर येईल, हे झाकण्यासाठी लपवण्यासाठी हे वक्तव्य केलं गेलं. विधानसभेतही मुख्यमंत्र्यांनी वेदांता प्रकल्प येतोय, हे भाषणात सांगितलं होतं. तुम्हीच आता टक्केवारीचा आरोप करताय. हे निरर्थक आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवावं, कोणी टक्केवारी मागितली ते. धादांत खोटं आहे, असं आव्हान  पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलं.झेंडा शिवसेनेचा आणि अजेंडा राष्ट्रवादीचा अस मी कधीहि ऐकलं नाहि. काल केलेली वक्तव्य राजकीय असल्यामुळे त्याला जास्त महत्व द्यायच नसते,असे  पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारSocialसामाजिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदे