आयपीएलच्या यंदाच्या हंगामात संघर्षाचा सामना करत दोन विजयासह वेग पकडण्याच्या मार्गावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्सलाआयुष म्हात्रेच्या रुपात मोठा धक्का बसला आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात स्नायू दुखापतीनं त्रस्त दिसलेला युवा बॅटर उर्वरित हंगामातून बाहेर पडला आहे. गत हंगामात ऋतुराज गायवाडच्या दुखापतीमुळे CSK च्या ताफ्यात वाइल्ड कार्ड एन्ट्री मारल्यावर त्याने CSK तील आपली सीट कन्फर्म केली होती. यंदाच्या हंगामात CSK च्या फलंदाजीतील तो महत्त्वपूर्ण सदस्य होता. पण आता CSK वर त्याच्या जागी बदली खेळाडू शोधण्याची वेळ आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोण घेणार आयुष म्हात्रेची जागा?
आयुष म्हात्रेच्या आधी CSK च्या संघाला खलिल अहमद आणि नॅथन एलिस यांच्या रुपात धक्क्यावर धक्का बसल्याचे पाहायला मिळाले होते. एलिसच्या जागी चन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात १.५ कोटीसह स्पेन्सर जॉन्सनची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाले. खलील अहमदच्या जागी आकाश मधवाल की, राजवर्धन हंगरगेकर? हा प्रश्न चर्चेत असताना चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला आता आयुष म्हात्रेच्या जागी नवा भिडू शोधावा लागणार आहे. इथं एक नजर टाकुयात कोण ठरेल आयुष म्हात्रेचा सर्वोत्तम पर्याय त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
स्वास्तिक चिकारा
उत्तर प्रदेशचा उजव्या हाताचा सलामीवीर आयुष म्हात्रेच्या जागी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. सध्याच्या घडीला तो प्रबळ दावेदारही मानला जात आहे. २०२६ मध्ये स्वास्तिक चिकारा याने अयोध्या प्रीमियर लीगमध्ये गोमती थंडरच्या संघाकडून खेळताना फक्त ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा कुटल्या होत्या. गत हंगामात तो RCB च्या संघाचा भाग होता. पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. CSK चा कर्णधार ऋतुराज गायकवाड डावाची सुरुवात करुन देण्यात सातत्याने अपयशी ठरत आहे. जर CSK च्या संघाने स्वास्तिक चिकाराला संधी दिली तर तो सलामीवीराच्या रुपात CSK साठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो.
अथर्व तायडे
अथर्व तायडे आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात अनसोल्ड राहिला होता. अथर्वने आपल्या कॅप्टन्सीत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात विदर्भ संघाला जेतेपद मिळवून दिले होते. सौराष्ट्र विरुद्धच्या अंतिम सामन्या त्याने १२८ धावांची मॅच विनिंग खेळी केली होती. याआधी तो पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबादचाही भाग राहिला आहे. CSK साठी हा देखील एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
मनन वोहरा
आघाडीच्या फळीतील अनुभवी फलंदाज मनन वोहरा हा देखील २०२६ च्या मिनी लिलावातील अनसोल्ड खेळाडू आहे. तो चंडीगड संघाचे नेतृत्व करत असून देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो सक्रीय आहे. त्याच्या नावाचाही CSK च्या संघाला विचार करता येईल.
यश धुलयश धुल याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीची खास छाप सोडली आहे. मिनी लिलावात अनसोल्ड राहिलेल्या या क्रिकेटरचे २०२४ मध्ये ह्दयाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्याने दमदार कामगिरीसह पुनरागमन केले आहे. यश धुल हा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग राहिला आहे. पण ४ सामन्यात त्याच्या खात्यात फक्त १६ धावा जमा आहेत.
Web Summary : Ayush Mhatre's injury forces CSK to seek a replacement. Swastik Chikara, Atharva Taide, Manan Vohra, and Yash Dhull are potential candidates. Chikara's T20 record makes him a strong contender. Taide's captaincy is another advantage.
Web Summary : आयुष म्हात्रे की चोट के कारण CSK को एक विकल्प की तलाश है। स्वास्तिक चिकारा, अथर्व तायडे, मनन वोहरा और यश धुल संभावित उम्मीदवार हैं। चिकारा का टी20 रिकॉर्ड उन्हें एक मजबूत दावेदार बनाता है। तायडे की कप्तानी एक और फायदा है।