Ayush Mhatre Ruled Out, CSK vs MI IPL 2026: चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघासाठी चालू आयपीएल २०२६च्या हंगामात एक मोठा धक्का बसला आहे. मराठमोळा युवा फलंदाज आयुष म्हात्रे दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सीएसकेने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
आयुष म्हात्रेने का घेतली IPL 2026 मधून माघार?
१८ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात फलंदाजी करत असताना आयुषच्या डाव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगला (स्नायूंना) गंभीर दुखापत झाली होती. धाव घेताना आणि शॉट खेळताना झालेल्या या दुखापतीनंतर त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते. वैद्यकीय तपासणीनंतर असे समोर आले आहे की, ही दुखापत गंभीर स्वरूपाची असून त्याला पूर्णपणे सावरण्यासाठी ६ ते १२ आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे आता तो यंदाच्या हंगामात चेन्नईकडून खेळू शकणार नाही. त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.
दुखापतीबद्दल पुढे काय?
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आयुषला आता दीर्घकाळ विश्रांती आणि पुनर्वसन (Rehabilitation) प्रक्रियेतून जावे लागेल. या प्रक्रियेमुळे तो आयपीएलच्या या हंगामातील पुढील सर्व सामन्यांना मुकणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आयुष म्हात्रे आयपीएल २०२६ मधून बाहेर पडला आहे. आम्ही त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो."
CSK साठी चिंतेची बाब
मराठमोळ्या आयुष म्हात्रेने आपल्या फलंदाजीने या हंगामात सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सलामीला किंवा मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करण्याची त्याची क्षमता पाहता, कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संघ व्यवस्थापनासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. आता त्याच्या जागी चेन्नईचा संघ कोणत्या खेळाडूला संधी देणार किंवा बदली खेळाडू म्हणून कोणाची घोषणा करणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
सोशल मीडियावर चाहत्यांनी आयुषसाठी 'गेट वेल सून' असे संदेश पाठवून त्याला पाठिंबा दर्शवला आहे. आयुषच्या अनुपस्थितीत आता चेन्नईला आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करावे लागणार आहेत.
Web Summary : Chennai Super Kings faces a setback as batsman Ayush Mhatre is ruled out of IPL 2026 due to a hamstring injury sustained during a match against Sunrisers Hyderabad. His absence is a concern for CSK.
Web Summary : चेन्नई सुपर किंग्स को बड़ा झटका लगा है क्योंकि बल्लेबाज आयुष म्हात्रे हैमस्ट्रिंग की चोट के कारण आईपीएल 2026 से बाहर हो गए हैं, जो सनराइजर्स हैदराबाद के खिलाफ एक मैच के दौरान लगी थी। उनकी अनुपस्थिति सीएसके के लिए चिंता का विषय है।