RBI on Middle East Crisis: पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँके 'वेट अँड वॉच' या भूमिकेत असल्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलताना गव्हर्नर मल्होत्रा यांनी सांगितले की, पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाईवर दुय्यम परिणाम होऊ शकतात. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेताना सावध भूमिका आवश्यक आहे.
भारतावर काय परिणाम होणार?
मल्होत्रा यांनी नमूद केले की, पश्चिम आशियाशी भारताचे आर्थिक संबंध मोठ्या प्रमाणावर आहेत. भारताच्या एकूण निर्यातीपैकी सुमारे १/६ हिस्सा आणि आयातीपैकी सुमारे १/५ हिस्सा या भागाशी संबंधित आहे. याशिवाय, कच्च्या तेलाच्या आयातीपैकी जवळपास ५०% आणि खतांच्या आयातीपैकी सुमारे २/५ हिस्सादेखील याच भागातून येतो. या कारणांमुळे या प्रदेशातील तणावाचा भारतावर थेट परिणाम होऊ शकतो.
महागाईचा धोका आणि पुरवठा साखळीवर परिणाम...
मल्होत्रा पुढे म्हणाले की, जर पुरवठा साखळीतील अडथळे दीर्घकाळ टिकले, तर सुरुवातीचा पुरवठा धक्का पुढे जाऊन सर्वसाधारण किमतींमध्ये कायमस्वरूपी वाढ करू शकतो. महागाई अपेक्षांवर नियंत्रण ठेवणे हेच चलनविषयक धोरणाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
भारताची बँकिंग प्रणाली मजबूत
मल्होत्रा यांनी यावेळी असेही सांगितले की, भारताची वित्तीय प्रणाली मजबूत आणि स्थिर आहे. Insolvency and Bankruptcy Code (IBC), बँकिंग सुधारणा आणि जागतिक मानकांशी सुसंगत नियम यामुळे प्रणाली अधिक सक्षम झाली आहे. Unified Payments Interface (UPI) च्या यशानंतर RBI आता ‘युनिफाइड लेंडिंग इंटरफेस’ (ULI) विकसित करत आहे. यामुळे शेतकरी आणि लघुउद्योगांना काही मिनिटांत कर्ज पात्रता तपासणे शक्य होईल.
रेपो दर आणि धोरणात्मक भूमिका
दरम्यान, RBI च्या Monetary Policy Committee (MPC) ने एप्रिल बैठकीत रेपो दर ५.२५% वर स्थिर ठेवला आहे. तसेच ‘न्यूट्रल’ धोरण कायम ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची लवचिकता राहते. महागाईचा कल २०१६ पासून सरासरी महागाई ४.७% आहे, जो आधी (२०१२-२०१६) ७.४% होता. तर, ऑक्टोबर २०२५ मध्ये CPI महागाई ०.२५% (नीचांक) वर आहे. सध्या महागाई RBI च्या ४% लक्ष्याच्या खाली आहे (±२% मर्यादा), मात्र तेलाच्या किमती वाढ आणि पुरवठा अडथळ्यांमुळे पुढील काळात ती वाढण्याची शक्यता आहे.
FY27 साठी RBI चा अंदाजएकूण महागाई: ४.६%Q1: ४%Q2: ४.४%Q3: ५.२%Q4: ४.७%
Web Summary : RBI cautions that Middle East tensions could impact India's inflation via trade and oil imports. Supply chain disruptions may cause lasting price hikes. India's banking system is stable; ULI aims to ease farmer loans. MPC keeps rates steady, watching inflation.
Web Summary : आरबीआई ने चेतावनी दी है कि मध्य पूर्व तनाव व्यापार और तेल आयात के माध्यम से भारत की मुद्रास्फीति को प्रभावित कर सकता है। आपूर्ति श्रृंखला में व्यवधान से कीमतों में स्थायी वृद्धि हो सकती है। भारत की बैंकिंग प्रणाली स्थिर है; यूएलआई का उद्देश्य किसानों के ऋण को आसान बनाना है। एमपीसी मुद्रास्फीति पर नजर रखते हुए दरों को स्थिर रखता है।