पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना राजकारणात कार्यरत असलेल्या महिलांसंदर्भात अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते. याप्रकरणी बिहार राज्य महिला आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. २१ एप्रिल २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या या नोटीशीद्वारे आयोगाने यादव यांच्या विधानाचा तीव्र निषेध करत, त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे.
तीन दिवसांत उत्तर द्या -पप्पू यादव यांना बजावलेल्या नोटीसमध्ये आयोगाच्या अध्यक्ष अप्सरा यांनी म्हटले आहे. "सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये, आपण राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसंदर्भात अक्षेपार्ह विधान करताना दिसत आहात. यात आपण म्हटले आहे की, 'राजकारणात कारर्यरत महिला कोणत्या ना कोणत्या राजकारण्यासोबत बेड शेयर करूनच येतात. या विधानामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला आणि सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचतो."
खासदारकी धोक्यात? -नोटिशीमध्ये, "अशा प्रकारचे घृणास्पद विधान का करण्यात आले? तुमची खासदारकी रद्द करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे शिफारस का करू नये?" अशी विचारणाही आयोगाने केली आहे. आता या नोटिशीला पप्पू यादव काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय म्हणाले होते पप्पू यादव? -सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पप्पू यादव म्हणताना दिसत आहेत की, "९० टक्के महिला, नेत्याच्या रूममध्ये गेल्याशिवाय राजकारण करू शकत नाहीत. सातत्याने सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल होत असतात. शाळा असोत वा कार्यालये, सर्वत्र महिलांचे शोषण होते."
Web Summary : Pappu Yadav faces notice from Bihar Women's Commission for his offensive remarks about women in politics. The commission demands an explanation, questioning why recommendation to revoke his MP status shouldn't be made. Yadav's comment suggests women advance politically by sharing beds with politicians.
Web Summary : पप्पू यादव को राजनीति में महिलाओं पर आपत्तिजनक टिप्पणी के लिए बिहार महिला आयोग का नोटिस। आयोग ने स्पष्टीकरण मांगा, पूछा क्यों न उनकी सांसदी रद्द करने की सिफारिश की जाए। यादव का बयान बताता है कि महिलाएं नेताओं के साथ बिस्तर साझा करके आगे बढ़ती हैं।