शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 19:09 IST

लखनऊच्या केजीएमयूमध्ये १२ वी पास तरूणाने बनावट डॉक्टर बनून फसवणूक केल्याचा प्रकार उघड. हसम अहमदला पोलिसांनी केली अटक

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील प्रतिष्ठित किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १२ वी उत्तीर्ण असलेला एक तरुण स्वतःला एमबीबीएस डॉक्टर असल्याचे भासवून केजीएमयूमध्ये सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले आहे. हसम अहमद असे या आरोपीचे नाव असून, विद्यापीठ प्रशासनाने त्याला रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

बनावट कागदपत्रांचा मोठा खेळ

आरोपी हसम अहमद याने अत्यंत शिताफीने केजीएमयूच्या नावाचा, अधिकृत शिक्क्यांचा आणि डीनच्या स्वाक्षऱ्यांचा दुरुपयोग करून अनेक बनावट कागदपत्रे तयार केली होती. यामध्ये 'भारतीय गौरव प्रतिभा सम्मान २०२६'चे प्रशंसापत्र, होली अवकाश नोटिस आणि एमबीबीएस २०२३ बॅचच्या निवडीबाबतचे खोटे नोटिस यांचा समावेश आहे. या कागदपत्रांचा वापर करून तो केजीएमयूच्या नावाने मेडिकल कॅम्प आयोजित करत असे.

विद्यार्थ्यांशी साधायचा संपर्क

केवळ मेडिकल कॅम्पच नव्हे, तर हा तरुण डॉक्टरच्या वेशभूषेत विद्यापीठाच्या विविध विभागांत बिनधास्त फिरत असे. या माध्यमातून तो विद्यार्थी आणि विशेषतः विद्यार्थिनींशी संपर्क साधून त्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. एम्स, नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमांच्या नावाखाली विद्यार्थ्यांना आकर्षित करून बाहेर नेण्याची त्याची योजना होती. २० एप्रिल रोजी त्याच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने तातडीने हालचाली करत त्याला सर्जरी विभागाजवळ पकडले.

पोलिसांकडून कसून तपास

विद्यापीठाचे प्रवक्ते डॉ. के.के. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगुरूंच्या निर्देशानुसार नेमलेल्या तपास पथकाने या बोगस डॉक्टराचा पर्दाफाश केला. प्राथमिक चौकशीत हसम अहमद हा केवळ १२ वी उत्तीर्ण असल्याचे समोर आले आहे. समाजसेवेच्या नावाखाली तो एक संस्था चालवत होता. मात्र, वैद्यकीय क्षेत्रातील हा गंभीर फसवणुकीचा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस आरोपीची कसून चौकशी करत असून, या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सामील आहे, याचा तपास सुरू आहे.

विद्यार्थी आणि पालकांना आवाहन

केजीएमयू प्रशासनाने या घटनेनंतर कडक पवित्रा घेतला आहे. विद्यापीठाच्या नावाचा असा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कोणत्याही अनधिकृत पत्र किंवा माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी तिची केजीएमयूच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा प्रशासनाकडून खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake doctor busted at KGMU: 12th pass youth impersonated doctor.

Web Summary : A 12th-pass youth impersonating an MBBS doctor was caught at King George Medical University, Lucknow. Hasam Ahmed used forged documents, organized medical camps, and interacted with students. Police are investigating the fraud.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशfraudधोकेबाजी