केरळमधील त्रिशूर येथे मंगळवारी दुपारी एका फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाले. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याचे समजते. मुण्डाथिकोड परिसरातील एका शेडमध्ये आगामी 'त्रिशूर पूरम' उत्सवासाठी फटाके तयार करण्याचे काम सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ४० कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावरून घटनास्थळीही साधारणपणे ४० कामगार उपस्थित असल्याचा अंदाज आहे. यांपैकी अनेक जण गंभीररीत्या भाजले आहेत.
बचावकार्यात मोठा अडथळा -ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून स्थानिक नागरिकही या मदतकार्यात सहभागी झाले आहेत. दरम्यान, प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास पहिला स्फोट झाला आणि त्यानंतरही अधूनमधून स्फोट होत आहेत. यामुळे मदतकार्यातही मोठे अडथळे आले. एका भात शेतात तात्पुरत्या शेडमध्ये हे फटाके बनवण्याचे काम सुरू होते. या स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आल्याचेही समजते. महत्वाचे म्हणजे, या स्फोटाने परिसरातील घरांचेही नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्र्यांचे वैद्यकीय मदतीचे आणि चौकशीचे आदेश -मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या घटनेसंदर्भात तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, जखमींना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देशही दिले आहेत. याशिवाय, आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी त्रिशूर मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटलमध्ये विशेष व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, १०८ रुग्णवाहिका सेवा सज्ज ठेवण्यात आली आहे. त्रिशूर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दंडाधिकारी (Magisterial) चौकशी करण्याचे आदेश दिले असून, वाढत्या उष्णतेमुळे हा स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून शोक व्यक्त -दरम्यान, पंतप्रधान कार्यालयानेही (PMO) या भीषण अपघातावर शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त करत जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे.
Web Summary : A massive explosion at a Kerala firecracker factory killed 13 and injured many. The blast occurred during preparations for the Thrissur Pooram festival. Rescue operations face challenges due to ongoing explosions. An investigation has been ordered, with heat suspected as the cause.
Web Summary : केरल के एक पटाखा फैक्ट्री में भीषण विस्फोट से 13 लोगों की मौत हो गई और कई घायल हो गए। विस्फोट त्रिशूर पूरम उत्सव की तैयारियों के दौरान हुआ। लगातार विस्फोटों के कारण बचाव कार्यों में बाधा आ रही है। जांच के आदेश दिए गए हैं, गर्मी को कारण माना जा रहा है।