शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 20:18 IST

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवकाला उपजिल्हाधिकारी किंवा पोलिस उपअधीक्षक पदाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल दोन कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

दिगांबर जवादे 

गडचिरोली : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवकाला उपजिल्हाधिकारी किंवा पोलिस उपअधीक्षक पदाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल दोन कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी पुणे गाठून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ज्ञानेश्वर वारे (४०, रा. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.             गडचिरोली येथील एक युवक पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. याच कालावधीत ज्ञानेश्वर वारे याच्याशी त्याची ओळख झाली. वारे याने आपण वरिष्ठ अधिकारी व मोठ्या नेत्यांशी संबंधित असल्याचे भासवून, युवकाला उपजिल्हाधिकारी किंवा पोलिस उपअधीक्षक पदाची नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या बदल्यात वारे याने गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने युवकाकडून दोन कोटी रुपये उकळले. मात्र, दोन वर्षे उलटूनही नोकरी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवकाने १९ एप्रिल रोजी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

'सिनेस्टाईल' पाठलाग अन् अटक

तक्रार दाखल झाल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपीचे लोकेशन तपासले असता तो सुरुवातीला मुंबईत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांची पावले आपल्या दिशेने पडत असल्याची चाहूल लागताच आरोपीने मुंबई सोडून पुण्याकडे पलायन केले. मात्र, गडचिरोली पोलिसांनी त्याचा पिच्छा सोडला नाही. पुण्यात सापळा रचून गडचिरोली पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत आरोपी ज्ञानेश्वर वारे याला अटक केली.

अनेक बळी असण्याची शक्यता

दोन कोटींची फसवणूक झाल्याने गडचिरोली शहरात मोठी खळबळ उडाली आहे. वारे याने केवळ या युवकाचीच फसवणूक केली आहे की अशाप्रकारे अनेकांना नोकरीचे आमिष दाखवून गंडा घातला आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. या कारवाईमुळे नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Job Racket Busted: Man Arrested for Duping Youth of Millions

Web Summary : A youth was conned out of ₹2 crore with the promise of a government job. Police arrested the accused in Pune after a chase.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली