शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 20:01 IST

१ एप्रिलपासून सर्व राज्यांमध्ये E20 पेट्रोलची विक्री अनिवार्य करण्यात आली आहे...

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण जगच तेल टंचाईचा सामना करताना दिसत आहे. यातच आता भारत सरकार एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. आता देशात चक्क अल्कोहोलवर गाड्या चालवण्याची योजना आखली जात आहे. खरेतर, हा प्लॅन प्रत्यक्षात उतरण्यास काही वर्षे लागू शकतात. मात्र त्याची प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू करण्यात येणार आहे.

काय आहे सरकारचा E85 प्लॅन? -इथेनॉल-२० (E20) नंतर आता सरकार इथेनॉल-८५ म्हणजेच 'E85' इंधन आणण्याच्या तयारीत आहे. या इंधनामध्ये ८५ टक्के अल्कोहोल आणि केवळ १५ टक्केच पेट्रोलचा समावेश असेल. माध्यमांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांनुसार, २०१६ मध्येच हा प्रस्ताव मांडण्यात आला होता आणि आता त्यावर लवकरच मसुदा नियम (Draft Rules) जारी केले जाणार आहेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बाजारातही या इंधनासंदर्भात सकारात्मक सहमती बनली असून प्राथमिक चाचण्यांनाही सुरुवात झाली आहे.

इंजिनमध्ये करावे लागणार विशेष बदल -महत्वाचे म्हणजे, E85 इंधनाचा वापर करण्यासाठी गाड्यांच्या इंजिनमध्ये विशेष बदल करावे लागतील. सामान्य गाड्यांमध्ये हे इंधन वापरल्यास इंजिनला गंज लागणे किंवा सील खराब होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे केवळ 'फ्लेक्स फ्युअल व्हेईकल' (FFV) मध्येच याचा वापर करता येईल. इथेनॉलची निर्मिती देशांतर्गत स्तरावर ऊस, गहू आणि इतर धान्यांपासून केली जाते.

१ एप्रिलपासून E20 पेट्रोलची विक्री अनिवार्य -सध्या अमेरिका-इराण संघर्षामुळे 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुज'मध्ये तेल आणि गॅसची जहाजे अडकली आहेत, यामुळे अनेक देश इंधन टंचाईला सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर E85 हे E20 पेक्षा वेगळ्या इंधन श्रेणीत आणले जाईल. १ एप्रिलपासून सर्व राज्यांमध्ये E20 पेट्रोलची विक्री अनिवार्य करण्यात आली आहे. पण भविष्यात E85 मुळे भारताचे परकीय तेलावरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Goodbye Petrol Problems? Cars to Run on Alcohol! Government's E85 Plan

Web Summary : Amidst global oil concerns, India plans E85 fuel (85% alcohol, 15% petrol). While requiring engine modifications, this initiative aims to reduce dependence on foreign oil. E20 fuel sales are already mandatory, paving the way for E85's future implementation.
टॅग्स :Petrolपेट्रोलCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीAutomobileवाहन