IPL 2026 SRH vs DC Abhishek Sharma Century : अभिषेक शर्मान दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करताना अवघ्या ४७ चेंडूत शतक साजरे केले. सनरायझर्स हैदराबादच्या डावातील १५ व्या षटकात नितीश राणाच्या षटकात लागोपाठ षटकार मारत त्याने IPL कारकिर्दीतील दुसऱ्या शतकाला गवसणी घातली. यासह त्याने किंग कोहलीसह क्विंटन डी कॉकच्या खास विक्रमाच्या बरोबरीचा डाव साधला.
शतकी खेळीसह किंग कोहलीसह या दिग्गजांच्या पंक्तीत
अभिषेक शर्मानं दिल्ली कॅपिलटल्सविरुद्ध आयपीएलमधील दुसरे तर टी-२० कारकिर्दीतील नववे शतक ठोकले. या खेळीसह त्याने विराट कोहली, क्विंटन डी कॉक यांच्या खास विक्रमाशी बरोबरी केली. आहे. टी-२० मध्ये सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या बॅटर्सच्या यादीत ख्रिस गेल सर्वात अव्वलस्थानी आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत २२ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके
२२ ख्रिस गेल१२ बाबर आझम१० डेविड वॉर्नर९ क्विंटन डी ककॉक, विराट कोहली. रिले रुसो, साहिबजादा फरहान, अभिषेक शर्मा
२००० धावांचा पल्ला पार करणारा SRH चा चौथा फलंदाज
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या १० व्या षटकात ५९ धावा करताच अभिषेक शर्मानं सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून २००० धावांचा पल्ला पार केला. अभिषेक शर्मा हा सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून २००० धावांचा पल्ला गाठणारा चौथा आणि दुसरा भारतीय ठरला. याआधी ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नर याने हा डाव साधला होता. हैदराबादच्या संघाकडून ९५ सामन्यात त्याच्या खात्यात ४०१४ धावांची नोंद आहे. SRH कडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शिखर धवन २७६८ धावांसह दुसऱ्या तर केन विल्यमसन २१०१ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
Web Summary : Abhishek Sharma hammered a blistering century in just 47 balls against Delhi Capitals, marking his second IPL hundred. He reached his half-century in 25 balls and surpassed 2000 IPL runs. He is the fourth player and second Indian to achieve 2000 runs for Sunrisers Hyderabad.
Web Summary : अभिषेक शर्मा ने दिल्ली कैपिटल्स के खिलाफ 47 गेंदों में शानदार शतक जड़ा, जो आईपीएल में उनका दूसरा शतक है। उन्होंने 25 गेंदों में अर्धशतक पूरा किया और 2000 आईपीएल रन बनाए। वह सनराइजर्स हैदराबाद के लिए 2000 रन बनाने वाले चौथे और दूसरे भारतीय खिलाड़ी हैं।