विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. चेन्नईत आयोजित पत्रकार परिषदेत खर्गे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहशतवादी असे संबोधले आहे. यामुळे मतदान तोंडावर आल्यानंतर देशात मोठा वाद उफाळून येणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, "AIADMK मोदींशी हातमिळवणी कशी करू शकतात? ते एक दहशतवादी आहेत. आणि ते असे व्यक्ती आहेत ज्यांचा समानतेवर विश्वास नाही. त्यांच्या पक्षाचाही समानता आणि न्यायावर विश्वास नाही. आणि हे लोक त्यांच्याशी हातमिळवणी करत आहेत. AIADMK लोकशाही कमकुवत करत असून ते पेरियार आणि आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधात काम करत आहेत'' मात्र, काही वेळातच खड़गे यांनी यावर स्पष्टीकरण देऊन आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
खर्गे पुढे म्हणाले की, "पंतप्रधान मोदी हे लोकांना आतंकित करत आहेत. आयटी, ईडी आणि इतर स्वायत्त संस्थांचा वापर करून ते विरोधकांना आणि सर्वसामान्यांना धमकावत आहेत. मी केवळ हे स्पष्ट करत होतो की ते हुकूमशाही पद्धतीने काम करत आहेत."
Web Summary : Mallikarjun Kharge labeled Narendra Modi a 'terrorist' during a press conference, sparking controversy. He later clarified, stating he meant Modi intimidates people using agencies like ED, acting dictatorially. This occurred amidst upcoming elections.
Web Summary : मल्लिकार्जुन खरगे ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में नरेंद्र मोदी को 'आतंकवादी' कहा, जिससे विवाद पैदा हो गया। बाद में उन्होंने स्पष्ट किया कि उनका मतलब था कि मोदी ईडी जैसी एजेंसियों का उपयोग करके लोगों को डराते हैं, और तानाशाह की तरह काम करते हैं। यह आगामी चुनावों के बीच हुआ।