उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भारतीय पर्यटक आता पाश्चिमात्य देशांऐवजी आशियाई देशांकडे वळत आहेत. एअरबीएनबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय पर्यटकांमध्ये ओसाका, टोकियो आणि बुसान यांसारख्या शहरांबाबत प्रचंड उत्सुकता वाढली आहे. उत्तम कनेक्टिव्हिटी, कमी प्रवासाचा वेळ आणि सांस्कृतिक जवळीक यामुळे आशियाई देश भारतीयांसाठी 'समर गेटवे' बनले आहेत.
एकूण सर्चमध्ये ४०% हून अधिक वाटा जेनरेशन झेडचा आहे. या पिढीचा कल दरवर्षी ६०% दराने वाढत असून, ते प्रामुख्याने सांस्कृतिक अनुभव, संगीत महोत्सव आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीसाठी प्रवास करत आहेत. दक्षिण कोरियाचे बुसान (९५% पेक्षा जास्त वाढ), जपानमधील टोकियो (९०% पेक्षा जास्त) आणि ओसाका (८५% पेक्षा जास्त) या शहरांसाठी भारतीयांनी सर्वाधिक सर्च केले आहेत. तसेच क्वालालंपूर आणि बँकॉक यांसारख्या शहरांनाही सातत्यपूर्ण पसंती मिळत आहे.
कौटुंबिक आणि ग्रुप ट्रॅव्हलजवळजवळ ६०% सर्च हे ग्रुप किंवा फॅमिली ट्रॅव्हलसाठी असून, ३०% पेक्षा जास्त सर्च दोन व्यक्तींच्या प्रवासासाठी आहेत.
देशांतर्गत पर्यटनातही बदलभारतातही पर्यटकांनी ठराविक ठिकाणांच्या पलीकडे जाऊन निसर्ग आणि वारसा स्थळांना पसंती दिली आहे. यामध्ये तिरुवनंतपुरम (९०% वाढ), पुरी (३०%), जयपूर (७०%) आणि मेघालय (७०%) या राज्यांमध्ये पर्यटकांचा कल वाढला आहे.
Web Summary : Indian tourists favor Asian destinations like Osaka and Tokyo due to better connectivity. Gen Z drives tourism growth, seeking cultural experiences. Family travel accounts for 60% of searches. Domestically, interest rises in locations like Thiruvananthapuram and Meghalaya.
Web Summary : भारतीय पर्यटक पश्चिमी देशों की बजाय एशियाई देशों को पसंद कर रहे हैं। ओसाका, टोक्यो जैसे शहरों में रुचि बढ़ी है। सांस्कृतिक अनुभव और स्थानीय भोजन के लिए युवा पर्यटकों की संख्या बढ़ रही है। तिरुवनंतपुरम और मेघालय में भी पर्यटन बढ़ रहा है।