क्रिकेटच्या मैदानात जेव्हा एखादा फलंदाज खाते न उघडता म्हणजेच '०' धावांवर बाद होतो, तेव्हा त्याला 'डक' (Duck) असे म्हटले जाते. सचिन तेंडुलकरपासून विराट कोहलीपर्यंत प्रत्येक महान खेळाडू कधी ना कधी शून्यावर बाद झाला आहे. मात्र, १४९ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला दुर्दैवी खेळाडू कोण होता? याचे उत्तर १८७७ मध्ये झालेल्या पहिल्याच कसोटी सामन्यात मिळते.
इतिहासातील पहिले 'डक' -१५ मार्च १८७७ रोजी मेलबर्न येथे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात क्रिकेट इतिहासातील पहिला अधिकृत कसोटी सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज नेड ग्रेगरी (Ned Gregory) हा खाते न उघडता बाद झाला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा शून्यावर बाद होण्याचा हा नकोसा विक्रम नेड ग्रेगरी यांच्या नावे नोंदवला गेला. इंग्लंडचा गोलंदाज जेम्स साउथर्टन याने ग्रेगरी यांना बाद केले होते.
कारकीर्दीतील एकमेव सामना -नेड ग्रेगरी यांनी ऑस्ट्रेलियासाठी त्यांच्या कारकीर्दीत फक्त एकच कसोटी सामना खेळला. याच सामन्याच्या पहिल्या डावात ते शून्यावर बाद झाले, तर दुसऱ्या डावात त्यांनी ११ धावा केल्या. अर्थात ग्रेगरी यांचा हा पदार्पणाचा सामनाच शेवटचा सामना ठरला.
कसा आला 'डक' शब्द - शून्यावर बाद होण्याला 'डक' म्हणण्यामागे एक रंजक इतिहास आहे. हा शब्द 'डक एग' (बत्तखचे अंडे) यावरून आला आहे. १८६६ मध्ये वेल्सचे राजकुमार जेव्हा शून्यावर बाद झाले, तेव्हा एका वृत्तपत्राने 'त्यांनी बत्तखचे अंडे बनवले' असे लिहिले होते, कारण '०' चा आकार बत्तखच्या अंड्यासारखा असतो. तेव्हापासून क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होण्याला 'डक' म्हटले जाऊ लागले.
Web Summary : Ned Gregory was the first cricketer dismissed for zero in 1877. The term 'duck' originated from 'duck's egg' after a prince's zero score.
Web Summary : नेड ग्रेगरी 1877 में शून्य पर आउट होने वाले पहले क्रिकेटर थे। 'डक' शब्द की उत्पत्ति 'डक एग' से हुई, जो एक राजकुमार के शून्य स्कोर के बाद प्रचलित हुआ।