बुडापेस्ट: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हंगेरीची यात्रा केल्यास त्यांना अटक केली जाऊ शकते, असे खळबळजनक विधान हंगेरीचे नवनियुक्त पंतप्रधान पीटर माग्यार यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या नियमांचे पालन करत ही कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ज्या व्यक्तींविरुद्ध आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे अटक वॉरंट जारी आहे, त्यांनी हंगेरीच्या सीमेत प्रवेश केल्यास त्यांना तात्काळ ताब्यात घेतले जाईल, असे माग्यार यांनी स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. हंगेरीच्या मागील सरकारने ICC मधून बाहेर पडण्याचा विचार केला होता. मात्र, माग्यार यांनी हा निर्णय फिरवला असून हंगेरी या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा सदस्य राहील, असे स्पष्ट केले आहे.
आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदरनेतन्याहू यांच्या विरोधात गाझा युद्धातील कथित युद्ध गुन्ह्यांसाठी ICC ने अटक वॉरंट जारी केलेले आहे. हंगेरी आता या जागतिक कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे.
इस्रायली युद्धनौकांचा गाझा किनारपट्टीवर गोळीबारदरम्यान, गाझा पट्टीच्या उत्तर किनारपट्टीवर इस्रायली नौदलाने केलेल्या गोळीबारात एका पॅलेस्टिनी महिलेचा मृत्यू झाला आहे. 'अल जझीरा अरबी'ने दिलेल्या वृत्तानुसार, किनारपट्टीच्या भागात उभ्या असलेल्या इस्रायली युद्धनौकांनी अचानक समुद्राच्या दिशेने असलेल्या नागरिकांना लक्ष्य केले. यामध्ये एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. सोमवारी झालेल्या विविध इस्रायली हल्ल्यांमध्ये एकूण पाच पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून इस्रायली नौदल आणि हवाई दल गाझाच्या विविध भागांत सातत्याने हल्ले करत आहे. ताज्या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा मानवी हक्कांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Web Summary : Hungary's PM Magya threatens to arrest Netanyahu if he enters, adhering to ICC rules. He reversed the previous government's consideration to exit ICC. Meanwhile, Israeli naval fire in Gaza killed a Palestinian woman, raising human rights concerns.
Web Summary : हंगरी के पीएम माग्यार ने नेतन्याहू के प्रवेश करने पर आईसीसी नियमों का पालन करते हुए गिरफ्तार करने की धमकी दी। उन्होंने पिछली सरकार के आईसीसी से बाहर निकलने के विचार को उलट दिया। इस बीच, गाजा में इजरायली नौसेना की गोलीबारी में एक फिलिस्तीनी महिला की मौत हो गई, जिससे मानवाधिकारों की चिंता बढ़ गई।