'बिग बॉस' फेम आणि स्पोर्ट्स प्रेसेंटर शेफाली बग्गा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपासून शेफाली बग्गा आणि क्रिकेटर युजवेंद्र चहल यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू होत्या. अशातच आता शेफालीने क्रिकेटर विराट कोहलीबाबत विधान केलं आहे. विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय असं शेफालीने म्हटलं आहे. तिचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे.
शेफालीने फिल्मीज्ञानशी बोलताना युजवेंद्र चहलसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर मौन सोडलं. ती म्हणाली, "या प्रश्नाचं उत्तर देऊन मला आता कंटाळा आलाय. मला आता यावर काहीही बोलायचं नाही. लोकांचे विचार खूप छोटे आहेत. लोक डिनरला डेटिंगचं नाव देतात. तो फक्त एक पापाराझी व्हिडीओ होता आणि लोक विचारत होते की शेफाली आणि युजवेंद्र डेट करत आहेत का? आमचं नातं काय आहे ते मला माहीत आहे आणि या गोष्टींनी फरक पडत नाही".
कोणत्याही क्रिकेटरला डेट करायचं नसल्याचंही शेफालीने स्पष्ट केलं. लाइफ पार्टनर कसा हवाय? याचं उत्तर देताना शेफालीने विराट कोहलीचं नाव घेतलं. "मला कोणत्याही क्रिकेटरला डेट करायचं नाही. विराट कोहली आणि एमएस धोनी यांची मी फॅन होते. पण आता ते ऑप्शन माझ्याकडे नाहीत. आणि बाकी दुसरे क्रिकेटर माझ्यापेक्षा छोटे असतील. मला काळजी घेणारा, भावनिक असणारा आणि मला वेळ देणारा लाइफ पार्टनर हवाय. जसे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा असतात. विराट कोहली किती बिझी असतो. पण तरीदेखील अनुष्काबद्दलचं प्रेम नेहमी व्यक्त करतो. मला असा मुलगा हवाय. या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात", असं शेफाली म्हणाली.
Web Summary : Bigg Boss fame Shefali Bagga, amidst Yuzvendra Chahal dating rumors, clarified she desires a partner like Virat Kohli. She dismissed dating cricketers, admiring Kohli's affection for Anushka despite his busy schedule, emphasizing care, emotion, and time from a partner.
Web Summary : युजवेंद्र चहल के साथ डेटिंग की अफवाहों के बीच, बिग बॉस फेम शेफाली बग्गा ने स्पष्ट किया कि वह विराट कोहली जैसा साथी चाहती हैं। उन्होंने क्रिकेटरों को डेट करने से इनकार किया, कोहली के अनुष्का के प्रति व्यस्त कार्यक्रम के बावजूद स्नेह की प्रशंसा की और एक साथी से देखभाल, भावना और समय पर जोर दिया।