विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदीपश्चिम बंगालमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी झाल मुरीचा आस्वाद घेतला. पंतप्रधान मोदींचा झाल मुरी विकत घेतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला. मोदींच्या या व्हिडीओवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीका केली. त्या म्हणाल्या की, ही एक नौटंकीच होती.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, झाडग्राममध्ये निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी अचानक झाल मुरी खेरदी करण्यासाठी थांबतात, ही फक्त एक नौटंकी होती.
हे खरंच विश्वास ठेवण्यासारखं आहे का?
ममता बॅनर्जी या बीरभूम जिल्ह्यातील मुरारई विधानसभा मतदारसंघात प्रचारसभेत बोलत होत्या. "प्रचारावेळी पंतप्रधान मोदी हे कोणत्याही पूर्व नियोजित कार्यक्रमाशिवाय अचानक झाल मुरी खरेदी करण्यासाठी थांबतात. त्यावेळी तिथे कॅमेऱ्यावाले कसे होते?", असा सवाल ममतांनी केला.
"तिथे कॅमेरे आधीच लावलेले होते. एसपीजीने (सुरक्षा) सगळी सुरक्षा व्यवस्था केलेली होती. पंतप्रधान आपल्या खिशातून जेव्हा १० रुपयांची नोट काढून देतात. खरंच हे विश्वास ठेवण्यासारखं आहे का? ही सगळी फक्त नौटंकी होती.", अशी टीका ममता बॅनर्जी यांनी मोदींवर केली.
लोकांना मटण-मासे खाण्यापासून का रोखले जात आहे?
ममता बॅनर्जी म्हणाल्या, "तुम्हाला अचानक झाल मुरी आवडायला लागली आहे. पण, भाजपाचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये लोकांना मांस आणि मासे खाण्यापासून का रोखले जात आहे? प्रत्येकाला आपल्या आवडीचे खाद्य खाण्याचा अधिकार आहे. मला लिट्टी आणि ढोकला आवडतो. मग, मी तुमच्या मांसाहार करण्यावर बंदी घालायला पाहिजे का?", असा ममता बॅनर्जींनी केला.
Web Summary : Mamata Banerjee criticized Narendra Modi's Jhal Muri video during West Bengal elections, calling it a staged act. She questioned the timing and presence of cameras, suggesting it was pre-planned. Banerjee also questioned why some BJP states restrict meat consumption, defending everyone's right to choose their food.
Web Summary : ममता बनर्जी ने पश्चिम बंगाल चुनाव के दौरान नरेंद्र मोदी के झाल मुरी वीडियो की आलोचना करते हुए इसे एक नौटंकी करार दिया। उन्होंने कैमरों की टाइमिंग पर सवाल उठाया और कहा कि यह पूर्व नियोजित था। बनर्जी ने यह भी पूछा कि कुछ भाजपा शासित राज्य मांस खाने पर प्रतिबंध क्यों लगाते हैं, और सभी के भोजन चुनने के अधिकार का बचाव किया।